पंजाबी गायक यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांनी गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि गायकवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते. हनी सिंगला त्याची पत्नी शालिनी यांना एक कोटी रुपयांची पोटगी द्यावी लागली आहे. दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात हनी सिंगने पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये पत्नीला दिला.
हेही वाचा – Kangana Ranaut : ‘मी गांधीवादी नाही, मी तर…’; ‘कर्तव्यपथा’च्या उद्घाटनप्रसंगी कंगनाचं वक्तव्य!
वृत्तांवर विश्वास ठेवला तर शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटासाठी १० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये एक कोटी रुपयांवर समझोता झाला आहे. हनी सिंग आणि शालिनी यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. हनी सिंगने गुरुवारी दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात शालिनी तलवार यांना पोटगी म्हणून एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
रॅपर यो यो हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत शालिनीने 3 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिरदेश सिंग उर्फ हनी सिंग याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता. या दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. पण त्यांचा संसार आता तुटला आहे.
हनी सिंग आणि शालिनी यांचं 2011 मध्ये लग्न झालं होतं. त्यापूर्वी अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2014 मध्ये सर्वांना हनी सिंगच्या लग्नाची माहिती मिळाली. गायकाला त्याचं लग्न त्याच्या कारकिर्दीच्या मार्गावर येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी लग्न झाल्याचं लपवून ठेवलं होतं.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या