कार्तिक, चहर, पटेल संघात
या सामन्यासाठी दिनेश कार्तिकचं संघात पुनरागमन झालं आहे. कार्तिक पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्या जागी पुन्हा रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण आज कार्तिक आणि पंत हे दोघेही प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळतील. दुसरीकडे जाडेजाच्या जागी संघात आलेल्या अक्षर पटेलला अखेर संघात संधी मिळाली. तर आवेश खानच्या जागी आलेला दीपक चहर प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे.
भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), विराट, सूर्यकुमार, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन, दीपक हुडा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अर्शदीप सिंग
Afghanistan win the toss and will bowl first
Rohit Sharma rested, KL Rahul will lead the Indian side #INDvAFG | #AsiaCup2022 | Scorecard: https://t.co/z8iw8dn85Q pic.twitter.com/uiCKki3G4c
— ICC (@ICC) September 8, 2022
दोन्ही संघ स्पर्धेतून आऊट
आशिया चषकातल्या सलग दोन पराभवांनंतर टीम इंडियाचं आशिया चषकातलं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला आणि भारताच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. त्यामुळे आशिया चषकातल्या सुपर फोर फेरीतला आजचा अफगाणिस्तान आणि भारताचा सामना हा औपचारिक स्वरुपाचा असेल. पण हा सामना जिंकून स्पर्धेची विजयी सांगता करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या