विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडशी सामना
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताचा ग्रुप-2 मध्ये समावेश आहे. त्या गटात भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे. पण मुख्य स्पर्धेआधी होणाऱ्या सराव सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचं आव्हान असेल.
पहिला सराव सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया, 17 ऑक्टोबर. दु. 2 वा.
दुसरा सराव सामना – भारत वि. न्यूझीलंड – 19 ऑक्टोबर, दु. 2 वा.
दरम्यान 16 ऑक्टोबरपासून पात्रता फेरी तर 22 ऑक्टोबरपासून मुख्य फेरीचे सामने सुरु होतील.
हेही वाचा – Diamond League Final: इतिहास घडवण्यासाठी नीरज चोप्रा पुन्हा सज्ज, पाहा कसा आहे डायमंड लीगच्या मेगा फायनलचा कार्यक्रम?
विश्वचषकात भारताची सलामी पाकिस्तानशी
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुपारी 1.30 वा. हा सामना सुरु होईल. गेल्या विश्वचषकात पाकिस्ताननं टीम इंडियाला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच मात दिली होती. त्यामुळे यंदाही या दोन संघातला महामुकाबला आणखी चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या