क्रिकेटचं मैदान… नव्हे बॉक्सिंग रिंग
भारत-पाक महामुकाबल्याच्या टॉसवेळी शास्त्रींनी दोन्ही संघांच्या कर्णधारांची काहीशी अनोख्या पद्धतीनं ओळख करुन दिली. ‘ब्ल्यू कॉर्नरला रोहित शर्मा… ग्रीन कॉर्नरला बाबर आझम, पाकिस्तान’ हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल ही बॉक्सिंग रिंगमधली अनाऊन्समेंट आहे. पण ही बॉक्सिंग रिंगमधली अनाऊन्समेंट नव्हती. तर ही आशिया चषकाच्या टॉसची वेळ होती. रवी शास्त्रींनी अशा अनोख्या अंदाजात आणि एका वेगळ्याच एनर्जीनं सामन्याची सुरुवात केली.
रोहितला आवरलं नाही हसू
रवी शास्त्रींनी अशा वेगळ्याच जोशात सुरुवात करताच रोहित आणि बाबरनं एकमेकांकडे पाहिलं. आणि त्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर वेगळीच स्माईल दिसली. सोशल मीडियात रवी शास्त्रींचा हा व्हिडीओ आणि टॉसनंतरच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत.
#IndiaVsPak #RaviShastri #Toss called wrong by Shastri. A bit high already? pic.twitter.com/pIIxYwxLCM
— Srihari (@haagesummane_) September 4, 2022
पण टॉसवेळी शास्त्री चुकले
दरम्यान रवी शास्त्रींनी नाणेफेकीवेळी बाबर आझमनं टेल असा कॉल दिल्यानंतरही माईकवरुन चुकीचा कॉल दिला. बाबर टेल म्हटलं पण शास्त्रींची हेड्स अशी अनाऊन्समेंट केली. त्यामुळे थोड्या क्षणासाठी मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्टही गडबडले. पण त्यांनी नंतर बाबरनं टॉस जिंकल्याचं घोषित केलं. यावरुन शास्त्री बरेच ट्रोल झाले आहेत
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या