या’ खेळाडूंना करा तुमच्या संघात सामील, लाखो रुपये कमवून देण्याची शक्यता


MI vs KKR Playing 11: आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान, प्रत्येक संघानं 14 पैकी 10 सामने खेळले आहेत. आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं स्थान निश्चित झालं आहे. दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबईचा संघ बाहेर पडलाय. परंतु, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सात संघांमध्ये लढाई सुरू आहे. या यादीत कोलाकाता नाईट रायडर्सदेखील आहे. आज कोलकातच्या संघ मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. 


मुंबई इंडियन्सनं या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहे. तर, आठ सामने गमावले आहेत. मुंबईचे फक्त चार गुण आहेत. दुसरीकडं कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव स्वीकारला आहे. कोलकात्याचा संघ आठ गुणांसह 9व्या स्थानावर आहे. प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत. एवढेच नव्हेतर या तिन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे.


मुंबई विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (MI vs KKR Best Dream 11)


विकेटकिपर- ईशान किशन.


फलंदाज- श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिळक वर्मा, नितिश राणा.


अष्टपैलू खेळाडू- आंद्रे रसल (कर्णधार), सुनील नारायण.


गोलंदाज- टीम साऊथी, मुरगन अश्विन, जसप्रीत बुमराह.


पिच  रिपोर्ट 
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोठी धावसंख्या करण्यात आली आहे. या मैदानावर अखेरचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघानं 208 धावा केल्या होत्या. प्रत्त्युरात दिल्लीच्या संघ 117 धावाचं करू शकला. या मैदानावर आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 9 सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे.या पिचवर या विकेटवर प्रथम फलंदाजी करणे देखील वाईट नाही. रात्रीच्या लढतीमुळं दवाचा प्रभाव राहील. अशा स्थितीत नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


हे देखील वाचा-



  • IPL 2022: दिनेश कार्तिकच्या बॅटिंगवर अजय जाडेजा खूश; तर विराटच्या ‘फ्लॉप शो’वर म्हणाले…


  • MS Dhoni: मार्शच्या चेंडूवर षटकार मारून धोनीनं रचला इतिहास, कोहलीच्या ‘या’ खास विक्रमाशी केली बरोबरी


  • IPL 2022: भावाला लग्न मानवलं, डेवॉन कॉन्वेच्या दमदार सलामीवर मोईन अलीची भन्नाट कमेंट!



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने वाढदिवशी शेअर केले ‘Liger’ सिनेमाचे पोस्टर
Next सरकारकडून शेतकऱ्यांसाठी Good News! वर्षभरापासून बंद असलेली ‘ही’ योजन पुन्हा सुरु

Check Also

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमी संघाबाहेर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या …

ठरलं… टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी ‘हे’ खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार!

मुंबई, 17 सप्टेंबर: 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी जवळपास …