प्राजक्ता माळीने व्यक्त केली अजब इच्छा; म्हणाली ‘मला चंद्र, मंगळ अंतराळ…’

मुंबई, 14 सप्टेंबर : अभिनेत्री प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती कायम चर्चेत असते. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच तिचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये आहे. ती तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये करत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावरून या गोष्टीची माहिती दिली आहे. प्राजक्ताने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. तसेच या व्हिडिओद्वारे तिने एक इच्छा देखील बोलून दाखवली आहे.

प्राजक्ता नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्ट्मध्ये व्यस्त असते. पण आपल्या कामातून वेळ तिची भटकंती चालूच असते. दूर किंवा जवळ कुठेही फिरायची संधी प्राजक्ता अजिबात सोडत नाही. प्राजक्ताला सगळं जग फिरायचं आहे. एवढंच काय तर अंतराळ सुद्धा पालथं घालायचं आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून ही इच्छा व्यक्त केली आहे. प्राजक्ताने आतापर्यंत फिरलेल्या देशातील फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणतेय कि, ”फिरायला मिळालेला इंग्लंड हा १३ वा देश. (खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार…एक आईबरोबरची दुबई trip सोडल्यास सगळ्या trips कामानिमित्त किंवा sponsored होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू.”

पुढे तिने एक इच्छा व्यक्त केलीये. ती म्हणतेय कि, ”स्वतःच्या अथवा इतरांच्या पैशाने, कसही चालेल; पण सगळे देश फिरायची इच्छा आहे…
जगच काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघण्याची इच्छा आहे…अर्थात; देव जे जे दाखवेल ते आणि तेवढंच बघायला (भोगायला- त्यागायला) तयार आहे.”

हेही वाचा – Adipurush Teaser : या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर; राम अवतारात प्रभास जिंकणार प्रेक्षकांचं मन

लंडनमध्ये शूटिंग सुरु असलेल्या प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं नाव काही समोर आलेलं नाही.  पण सिनेमात कलाकारांची तगडी फौज आहे. प्राजक्तासह या सिनेमात अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

अलीकडेच प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ या वेब सीरिज मधील भूमिकेमुळे  चांगलीच चर्चेत आली होती. तिचे या भूमिकेसाठी कौतुक झाले होते. त्यानंतर आलेल्या ‘वाय’ या  सिनेमात  देखील प्राजक्तानं महत्वाची भूमिका निभावली होती. प्राजक्ता आता टेलिव्हिजनवर हास्यजत्रेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता तिच्या नव्या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

रणवीर सिंगपासून अक्षयपर्यंत कोण कोण झळकणार महाभारतात घ्या जाणून!

मुंबई, 14 सप्टेंबर :  बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमे बनवायचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत फक्त एका …

नवा गडी नवं राज्य: आनंदी मुलांना शिकवतेय रामरक्षा, अस्वस्थ झाली रमा

मुंबई : झी मराठीवर काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका नवा गडी नवं राज्य हळूहळू प्रेक्षकांच्या …