Navratri : नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्त्व काय? वाचा! – Lets Talk

Navratri : गणेशोत्वानंतर आता शारदीय नवरात्रौत्सवाची चाहूल लागलीय. येत्या 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान नऊ रंगाचं विशेष महत्त्व आहे. चला, तर नऊ रंग आणि त्यांचं विशेष महत्त्व जाणून घेऊयात…

1. नवरात्र प्रतिपदा तिथी : या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर ला शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. पांढरा म्हणजेच श्वेत रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे.

2. नवरात्र द्वितीया तिथी : या दिवशी 27 सप्टेंबरला देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. हा रंग साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.

3. नवरात्र तृतीया तिथी : या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. या देवीला नारंगी रंगाचं वस्त्र अर्पण केलं जाईल. हा रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे.

4. नवरात्र चतुर्थी तिथी : या दिवशी 29 सप्टेंबरला कुष्मांडा देवीची रूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. हा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचं प्रतिक आहे.

5. नवरात्र पंचमी तिथी : या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाईल. या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. हा रंग निसर्गाचं प्रतिक आहे.

6. नवरात्र षष्ठी तिथी : या दिवशी 1 ऑक्टोबरला कात्यानी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला राखाडी रंगाचं वस्त्र चढवलं जाईल. हा रंग बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे.

7. नवरात्र सप्तमी तिथी : या दिवशी 2 ऑक्टोबर अर्थात सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. हा रंग विश्वासाचं प्रतिक आहे.

8. नवरात्र अष्टमी तिथी : या दिवशी 3 ऑक्टोबरला अष्टमी आहे. यादिवशी महागौरीची आराधना केली जाईल. या दिवशी जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. हा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचं प्रतिक आहे.

9. नवरात्र नवमी तिथी : या दिवशी अर्थात 7 ऑक्टोबर नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंग शुभ आहे. हा रंग प्रेमाचं आणि स्त्री शक्तीचं प्रतिक आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

महाविद्यालयातील विद्यार्थी करत होते वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी

 नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील  पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल …

तरुणांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! 5 हजारांहून जास्त जागांसाठी होणार भरती

मुंबई : भारतीय स्टेट बँकेत (SBI) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र आणि …