अपयशही मुलांसाठी महत्वाचं, फेल्युअरमधून ‘या’ गोष्टी शिकतात मुलं, पालकांची मोठी चिंता मिटते

असं म्हटलं जातं, आयुष्याला आपल्याला बरंच काही शिकवून जातं. दुसऱ्याच्या अनुभवापेक्षा माणूस स्वतःच्या अनुभवावरून खूप काही शिकत असतं. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकत असतो. अनेक परिस्थितीत आपण अपयश अनुभवतो. तेव्हा ते अपयश खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांना देखील अपयशाची जाणीव असणे गरजेचे असते. कारण अपयशातून माणूस शिकतो ते यशातून बहुदा शिकत नाही.

मुलं आयुष्यात कितीही मोठी होऊ देत पालकांसाठी ती लहानच असतात. पालक देखील मुलांसाठी कायमच प्रोटेक्टीव असतात. मात्र मुलं जस जशी मोठी होतात तेव्हा त्यांच स्वतः वेगळं असं जग असतात. ज्यामध्ये अनेक चढ-उतार येत असतात. यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या इमोशन्समधून जावं लागतं. पालक प्रत्येकवेळी आपल्या मुलांसोहत खंबीरपणे उभे राहतात. मात्र असं प्रत्येकवेळी करणं शक्य नाही. त्यामुळे मुलांना अपयशही सकारात्मकपणे घेणे गरजेचे आहे हे शिकवलं पाहिजे. अपयशी झाल्यावर न डगमगता त्यावर काम करून यशस्वी होणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला वाटतं की, तुमच्या मुलाने जीवनात आनंदी असावं. तर त्याला अपयशाची चव देखील चाखूद्या. अपयशच तुम्हाला यशस्वी मार्गाकडे नेणार आहेत. याची जाणीव मुलांना करून द्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​अपयशाची जाणीव करून द्या

मुलं जर तुमच्याकडे रडत किंवा निराश होऊन आलं तर त्याला प्रत्येक पालकांनी पहिलं तर अतिशय सुरक्षित असल्याची जाणीव दिली पाहिजे. मुलाला सर्वात आधी जवळ घ्या मात्र त्याला अपयशाची जाणीव देखील करून द्या. तसेच त्याला हे देखील सांगा की, अपयश देखील जीवनात तितकंच महत्वाचं आहे. कारण अपयशातूनच यशाचा खरा आनंद घेता येणार आहे.

(वाचा – मृणाल दुसानिसची मुलगी इतकी गोड, लेकीचं नाव ठेवलं खास.. दोन अक्षरी नावांसाठी उत्तम पर्याय)

​थॉमस एडिसन इफेक्ट

एडिसन लाइट बल्बसाठी ओळखला जातो, परंतु एडिसनने पहिल्या चाचणीतच त्याचा शोध लावला नाही आणि त्याला कदाचित 1000 वेळा प्रयत्न करावे लागले. तुम्ही तुमच्या मुलाला एडिसनचे उदाहरण देऊन समजावून सांगावे की, अपयश हा जीवनाचा एक भाग आहे आणि अपयशानंतर हार न मानता यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहावे.

(वाचा – गरोदरपणात नाही होणार तुम्ही लठ्ठ, मुंबईचे डॉ अनू यांनी ‘या’ पदार्थांपासून दूर राहण्याचा दिला सल्ला)

​प्रत्येक पाऊल हे यशाच्या मार्गाने

मुलाला सर्वात महत्वाची गोष्ट शिकवा ती म्हणजे अपयशानंतर मुलाचं प्रत्येक पाऊल हे यशाच्या दृष्टीकोनातून असलं पाहिजे. तुम्ही या अपयशानंतर खचून न जाता नवीन गोष्ट शिकली पाहिजे हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं. जेव्हा आपण काही तरी नवीन शिकतो तेव्हा त्याची सुरूवात ही अगदी छोट्या गोष्टीपासून होते. अपयशही शिकण्यासारखं असतं. त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावं.

(वाचा – आई असावी तर अशी… पालकांनी महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून काय शिकावं?)

​अपयश कधीच चुकीचं नसतं

अपयश हे आपण जितके समजतो तितके वाईट नसते परंतु ते आपल्याला मजबूत बनवते आणि कधीकधी आपल्याला हे देखील कळते की खरोखर आपला कोण आहे. आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अपयश स्वीकारले तर ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतील.

(वाचा – Working Mother चं दुःख मांडतेय ट्विंकल खन्ना, ‘या’ 10 गोष्टींचा कामाला जाणाऱ्या स्त्रीने देखील केला नसेल विचार)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

नंबर न बदलता फ्रीमध्ये सिम कार्ड करा पोर्ट, पाहा सोपी स्टेप्स

नवी दिल्ली: Jio, Airtel, VI सह देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील अधिकाधिक ग्राहकांना स्वतःशी …

राणी एलिझाबेथसाठी प्रिन्स फिलिपने सोडला होता राजपाट…

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल (Balmoral Castle) येथे त्यांनी अखेरचा …