‘आदिपुरुष’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच 3ऑकटोबर रोजी या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित होणार आहे. सध्या जिकडेतिकडे याविषयीच चर्चा आहे. बाहुबली सारखाच ‘आदिपुरुष’ हा भव्यदिव्य सिनेमा असणार आहे. सुपरस्टार प्रभास या चित्रपटात भगवान रामच्या भूमिकेत झळकणार असून क्रिती सेनन आणि सनी सिंग हे कलाकार दिसणार आहेत. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी याआधी लोकमान्य’ हा मराठी तर तान्हाजी’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा – Koffee with Karan 7 : वरुणच्या उत्तरानं जिंकलं चाहत्यांचं मन; म्हणाला अभिनेता नाही तर ‘ही’ अभिनेत्री माझी स्पर्धक
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर 3ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचा टीझर ‘दसर्या’च्या दोन दिवस आधी रिलीज होत आहे. गंमत म्हणजे यावेळी प्रभास दिल्लीत ‘दसरा’ साजरा करताना दिसणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती लाल किल्ल्याच्या मैदानावर अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला सेट बनवणार आहेत. प्रभास यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
‘आदिपुरुष’चे शूटिंग खूप आधी संपले आहे. हा एक 3D चित्रपट असून VFX चे काम चालू होते. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. पण रिलीजनंतर हा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणे करेल यात शंका नाही. आता चित्रपटाचा टिझर पाहण्यासाठीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या