‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जो

Prabhas-Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत. बच्चन साहेबांची सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शनिवारी सांगितले की, त्यांनी अभिनेता प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटासाठी पहिला शॉट शूट केला आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘महानती’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सध्या या चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’

या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला ‘प्रोजेक्ट के’ असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

हेही वाचा :  Virat-Anushka : विरुष्काचा नामांकित स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडसोबत वाद

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

अमिताभ यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पहिला दिवस, पहिला शॉट. ‘बाहुबली’ हा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आणि त्याच्या प्रतिभा आणि त्याच्या विलक्षण नम्रते भरवून गेलोय. मी त्याच्याकडून खूप काही शिकण्यास उत्सुक आहे.

प्रभासची पोस्ट  

दुसरीकडे, प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …