Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Jhund New Song : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाची गाणी रिलीज करत आहेत. ‘झुंड’ चित्रपटातील गाणे ‘आया ये झुंड’नंतर आता ‘लफडा झाला’ (Lafda Zala) हे दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

4 मिनिटांच्या या फूट टॅपिंग बीट्स गाण्याचे संगीत अजय-अतुल या हिट जोडीने दिले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी यांनी या गाण्याचे बोल लिहिलेले असून, हे गाणे अजय गोगावले यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ पाहून त्यात कोणते तरी फंक्शन किंवा जल्लोष साजरा करत असल्याचे दिसते.

पाहा गाणे :

या गाण्याच्या रिलीजबद्दल सांगताना अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. इन्स्टाग्रामवर हे गाणे शेअर करत त्यांनी हटके कॅप्शन लिहिले की, ‘इनकी करतूतों पे कभी नहीं लगता ताला, कोशिश करोंगे तो समझ लेना लफडा झाला.’

पाहा पोस्ट :

‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

हेही वाचा :  Nora Fatehi : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेही न्यायालयात हजर

‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. विजय बारसे हे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लम सॉकरचे संस्थापक देखील आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. ‘झुंड’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज यांनी केली आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link