‘मजा मा’ या सिनेमाची गेली अनेक दिवस चर्चा होती. माधुरीबरोबर या सिनेमात अभिनेता गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंह, मल्हार ठाकर आणि निनाद कामत हे कलकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मजा मा चं पोस्टर रिलीज झालं आहे. ज्यात माधुरी डान्स करताना दिसत आहे. या सिनेमातही माधुरी तिच्या डान्सची जादू प्रेक्षकांवर घालणार आहे असं पोस्टरवरून दिसत आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांनीही माधुरीच्या नव्या सिनेमासाठी उत्सुकता दाखवली आहे.
हेही वाचा – ओळखा पाहू! बालपणात या मुलाने आपल्या हेयर स्टाईलने लोकांना केलं होतं थक्क; आज आहे बॉलिवूड सुपरस्टार
मजा मा सिनेमातून माधुरीची आजवर कधीही न पाहिलेली भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित या सिनेमात समलैंगिक महिलेची भूमिका साकारणार आहे. माधुरी यावेळी पहिल्यांदा अभिनेता गजराज रावबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.
आनंद तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाविषयी बोलताना आनंद तिवारी म्हटलं आहे की, ‘प्रेक्षक आज चांगल्या कंटेटच्या शोधात आहेत. त्यांना नव्या गोष्टी पाहायच्या आहेत. सिनेमाची कथा फ्रेश, विविध आणि आधुनिकतावादी आहे पण गोष्ट मनाला स्पर्शून जाणारी आहे. प्रेक्षकांना नवा जॉनर्स आणि अनुभव घ्यायचा असेल तर मजा मा हा सिनेमा नक्की पाहा’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या