आजच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तरच भारताला अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानने भारताला मोठा धक्का दिला आहे. कारण या सामन्यापूर्वी टॉस करण्यात आला. हा टॉस पाकिस्तानने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतया स्पर्धेत ज्या संघाने प्रथम गोलंदाजी केली त्यांनाच विजय मिळवता आल्याचे बहुतांशी पाहायला मिळाले आहे. भारताचे जे दोन्ही पराभव झाले, त्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती. या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणारा संघ पराभूत होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानुसार आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव होऊ शकतो आणि पाकिस्तानचा संघ विजयी ठरू शकतो, असे दिसत आहे. त्यामुळे हे असे घडले तर तो भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल.
… तर भारताचे आव्हान संपुष्टात येणार
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता बुधवारी होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने जर पाकिस्तानला पराभूत केले तर भारताला फायनलमध्ये पोहोचण्याचा दरवाजा किलकिला होऊ शकतो. कारण पाकिस्तानचा हा सुपर-४मधील पहिला पराभव असेल. स्पष्ट सांगायचे तर पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले आणि भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय साकारला तरच भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो, अन्यथा भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. त्यामुळे आता पहिल्यांदा तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात नेमकं काय होतं, हे पाहावे लागेल. कारण या एका सामन्यावर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पाकिस्तानचा पराभव हा भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची पहिली पायरी असेल. कारण श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केले, तर भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असू शकेल. पण त्यासाठी पहिल्यांला अफगाणिस्तानने पाकिस्तानसा पराभूत करणे गरजेचे आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या