‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंहचं निधन; मृत्यूपूर्वी पतीकडे केली होती ही मागणी

मुंबई, 18 सप्टेंबर : ‘इश्कबाज’ आणि ‘कुबूल है’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निशी सिंह भाडलीचं रविवारी निधन झालं आहे. निशी सिंहच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या जाण्याने कुटुंब, मित्र परिवार सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

गेल्या चार वर्षापासून निशी सिंह अर्धांगवायूची शिकार होती. टाईम्सच्या मुलाखतीनुसार, निशीचा पती लेखक-अभिनेता संजय भादली यांनी सांगितले की, निशी चार वर्षांपासून आजारी होती. 13 फेब्रुवारी 2019 रोजी तिला अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा झटका आला. त्यानंतर 24 मे 2022 रोजी पुन्हा तिसऱ्यांदा झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ती सतत रुग्णालयात दाखल होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वीच निशीने तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता. 16 सप्टेंबर रोजी ती 50 वर्षांची झाली होती. दुःखाची बातमी की आता आपल्यात नाही.

हेही वाचा –  फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; आज आहे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री

यावेळी संजय सिंह यांनी पत्नी निशीची शेवटची इच्छाही सांगितली. घशाच्या संसर्गामुळे ती काही दिवसांपासून अन्नात फक्त द्रव घेत होती. तिने वाढदिवसादिवशी तिचा आवडता बेसन लाडूही खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिने बेसन लाडू खाल्लाही.

दरम्यान,  निशीने केवळ 8 वर्षे इंडस्ट्रीत काम केले. मान्सून वेडिंग या चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर कमल हसन आणि मामूटीचा चित्रपट केला. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …