Kartik Arynan ने सांगितलं बॉलिवूड चित्रपट न चालण्याचं कारण, म्हणाला…

मुंबई, 10 सप्टेंबर :  यशाच्या उंच शिखरावर पोहचलेला अभिनेता कार्तिक आर्यनने आज CNN News18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात मुलाखत देत मनसोक्त गप्पा मारल्या. मुंबईत येण्यापासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल यावेळी त्यानं सांगितलं. याशिवाय अनेक गोष्टींचा खुलासाही केलेला पहायला मिळाला.

गेल्या काही काळापासून बॉलिवूडचे चित्रपट म्हणावे असे चालत नाहीत. त्यामुळे आता बॉलिवूड संपलंय किंवा बॉलिवूडला नवं काहीतरी करण्याची गरज आहे का? याविषयी कार्तिक CNN News18 च्या TOWN HALL च्या कार्यक्रमात बोलला. कार्तिक म्हणाला, मला वाटतंय चांगले चित्रपट चालतायेत. असं नाहीये की तुम्हाला वाटलं हा चित्रपट चालू शकत होत पण तो चालला नाही, असं काही नाहीये. ऑडियन्स स्मार्ट झालीये. त्यांना चांगलं मनोरंजन पाहिजे. ते त्याच्यासाठी पैसै भरतात, ते थिएटरमध्ये जातात. त्यांना तो 2-3 तासाचा वेळ एन्जॉय करायचा असतो. ते त्यांच्या आवडत्या लोकांसोबत जात असतात. त्यामुळे आपलं पण हे काम आहे की आपण तेवढाच चांगला चित्रपट त्यांना देऊ. तेवढाच चांगला कन्टेंट त्यांना देऊ. त्यामुळे जो चांगला कन्टेंट देईन ते चित्रपट चालतात. ज्या प्रकारचे चित्रपट यावर्षी चाललेत हे याचं चांगलं उदाहरण आहे’.

हेही वाचा –  सिनेमात सिलेक्शन कसं होतं? कार्तिकने सांगितला नवी मुंबईतनं ऑडिशनला जातानाचा किस्सा

याशिवाय कार्तिकने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी किती मेहनत घेतली हेही सांगितलं. ‘खारघरमध्ये राहत असल्यामुळे जिथे कुठे ऑडिशन असेल तिथे ट्रेनने जायचो. दोन-तीन वर्ष हे केलं. त्यानंतर मला प्यार का पंचनामाचं ऑडिशनही फेसबुकवरुनच मिळालं. माझ्याकडे पोर्टफोलिओ नव्हतं कारण त्यावेळी ते खूप महाग असायचं. मग मी मित्रांसोबतचे फोटो क्रॉप करुन पाठवायचो’. माझ्या फॅनने मला खूप सपोर्ट केला असल्याचंही यावेळी कार्तिक म्हणाला.

दरम्यान बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’ च्या शानदार यशानंतर कार्तिक आर्यनची लोकप्रियता वाढली आहे. सध्या कार्तिक आर्यनच्या हातात बॅक टू बॅक सिनेमे आहेत. त्यामुळे त्याचे चाहतेही त्याच्यासाठी खूप आनंदी आहेत.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टास्क, राडा अन् भांडणांची तारीख ठरली! वाचा कधीपासून सुरू होतंय बिग बॉस मराठी ४

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख …

अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला सुरु होणार Bigg Boss Marathi चा चौथा सीझन

मुंबई, 10 सप्टेंबर: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत …