मिलिंद गवळी यांनी लालाबागच्या राजाचं दर्शन घेताच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. “गणपती बाप्पा मोरया” म्हणत त्यांनी पोस्ट लिहायला सुरुवात केली आहे. मिलिंद यांनी म्हटलं की, ‘अनिरुद्धला खास लालबागच्या राजाच्या दर्शनाचे आमंत्रण आले आणि छान दर्शन ही झाले. दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाचा योग आला, दहा वर्षांपूर्वी पंडित जसराज आणि मधुराआई जसराज यांच्या यांच्यामुळे हा दर्शनाचा योग आला होता. बाप्पाच्या इच्छेने गोष्टी घडत असतात आणि त्याची इच्छा नसेल तर झाडाचं पान सुद्धा हालत’.
हेही वाचा – ‘सिंहिण, जंगलाची राणी’; prajakta mali चं नवं फोटोशूट चर्चेत
मिलिंद यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं की. ‘गणपती बाप्पा सगळ्यांचे कल्याण कर सगळ्यांना सुखी ठेव’. त्यांची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झालेली पहायला मिळाली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरुन कमेटं येत आहेत. शिवाय त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्सचा पाऊसही होताना दिसत आहे.
दरम्यान, मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी चित्रपटांच भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. चाहत्यांच्या मनात त्यांनी एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मिलिंद गवळी हे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. त्यांची भूमिका जरी नकारात्मक असली तरी त्यांच्या अभिनयाचं चाहत्यांना नेहमीच कौतुक असल्याचं पहायला मिळतं. त्यांच्यावर नेहमीच कौतुकांचा वर्षाव होतो.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या