पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या

PM Narendra Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. देशात आणि जगभरात त्यांच्यावर प्रेम करणारे करोडो लोक आहेत. गरीब कुटुंबातून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र मोदी अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा वाढदिवस (PM Modi Birthday) १७ सप्टेंबरला असतो. गुजरातमधील वडनगर या छोट्या शहरात त्यांचे आयुष्य कसे व्यतीत झाले आणि गांधी नगरच्या राजकीय वर्तुळात ते कसे सामील झाले, याविषयी अनेक किस्से सांगितले जातात. दरम्यान पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊया.

भारताच्या पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये मूळ वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन ५० हजार रुपये आहे. याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे. यासोबतच दैनंदिन २,००० रुपये म्हणजेच दरमहा ६१ हजार रुपये आहे. हे सर्व मिळून १,६०,००० लाख होतात. २०१२ पासून पंतप्रधानांना हा पगार मिळत आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या…
Chandrakant Patil Education: उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
निवृत्तीनंतरचे फायदे
पंतप्रधान निवृत्त होतात किंवा त्यांचे कार्यालय सोडतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी निवासस्थान दिले जाते. यासोबतच पाच वर्षांसाठी मोफत ट्रेन प्रवास, एसपीजी कव्हर, कार्यालयीन खर्चासह खासगी सचिव देखील दिले जातात. याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

– सहा देशांतर्गत स्तरावरील हवाई तिकिटे (एक्झिक्युटिव्ह क्लास).

– पूर्णपणे मोफत रेल्वे प्रवास.

– आजीवन मोफत निवास

– मोफत वैद्यकीय मदत

५ वर्षांसाठी संपूर्ण कार्यालयीन खर्च

एक वर्षासाठी एसपीजी संरक्षण

मोफत वीज आणि पाणी
पाच वर्षांनंतर: वैयक्तिक सहाय्यक आणि शिपाई, विमान आणि रेल्वे प्रवास, कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक ६ हजार रुपये

मी अंगठाछाप वाटतो का? असं ठणकावून विचारणारे तानाजी सावंत नेमकं शिकलेयत तरी कितवी ?

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

म. टा. प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा …

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …