कांगारुंकडून धावांचा मोठा डोंगर सर, मोहालीत टीम इंडिया पराभूत

मोहाली, 20 सप्टेंबर: मोहाली टी20त 208 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही रोहित शर्माच्या टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. कॅमेरुन ग्रीन आणि इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं सामना 4 विकेट्स राखून जिंकला. ग्रीननं 30 बॉलमध्ये 61 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, टीम डेव्हिडनं छोट्या छोट्या खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेनं नेलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

राहुल, पंड्या, सूर्यकुमारची फटकेबाजी

त्याआधी लोकेश राहुल, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमारच्या फटकेबाजीमुळे भारतानं 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 208 धावा फटकावल्या होत्या. हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या फलंदाजीसमोर कांगारुंच्या बॉलर्सनी अक्षरश: लोटांगण घातलं. हार्दिकनं आपल्या नाबाद 71 धावांच्या खेळीत तब्बल 7 फोर आणि पाच षटकार ठोकले. टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं आशिया कपमधला आपला फॉर्म कायम राखला. राहुलनं आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 62 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्यानंत 35 बॉलमध्ये 55 धावा फटकावल्या. त्यात 4 फोर आणि 3 सिक्सर्सचा समावेश होता. राहुलचं आंतरराष्ट्रीय टी20तलं हे आजवरचं 18वं अर्धशतक ठरलं. सूर्यकुमारनंही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना 25 बॉलमध्ये 46 धावा फटकावल्या.

Published by:Siddhesh Kanase

First published:

Tags: Cricket, Sports

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIकडे केली ही मागणी

मुंबई: ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक २०२२ सुरू होत आहे. या मोठ्या टूर्नामेंटपूर्वी टीम इंडिया …

जसप्रीत बुमराह कधी खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आली मोठी अपडेट

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात २०८ धावा करून देखील टीम इंडियाचा पराभव झाला. ३ सामन्यांच्या …