Breaking News

ICSE, ISC सेमिस्टर २ परीक्षेचे प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या अपडेट

ICSE, ISC Semester 2 Admit Card 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ICSE तसेच ISC म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या सत्र २ परीक्षेच्या प्रवेशपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट आहे. या परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार असून विद्यार्थी ISCE सेमिस्टर २ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE)तर्फे लवकरच अधिकृत वेबसाइट cisce.org वर ICSE आणि ISC सेमिस्टर २ परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील अपडेट माहिती मिळू शकेल.

आयसीएसईद्वारे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावी सेमिस्टर २ परीक्षा एप्रिल-जून, २०२२ मध्ये होणार आहेत. या अंतर्गत आयसीएसई सेमिस्टर २ च्या परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होतील आणि २३ मे रोजी संपतील. आयएससी सेमिस्टर २ च्या परीक्षा २५ एप्रिल ते ६ जून २०२२ या कालावधीत होणार आहेत. विद्यार्थ्यांना पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

RTE Admission: आरटीई प्रवेशांच्या प्रक्रियेला मुदतवाढ? जाणून घ्या अपडेट
CBSE, ICSE बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘या’ प्रकारे बनवा अभ्यासाचे वेळापत्रक
ICSE, ISC semester 2 Admit Card 2022: असे करा डाऊनलोड

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ISCE च्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर जा.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक नोटीस बोर्डवर उपलब्ध होईल.
आता लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

CBSE कडून दहावी, बारावी टर्म २ परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर
CBSE टर्म २ परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वाचा
प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ९० मिनिटांव्यतिरिक्त, त्यांना आयसीएसई आणि आयएससी या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न वाचण्यासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे निकाल जाहीर
ICSE Semester 2 exam 2022 Guidelines: आयसीएसई सेमिस्टर २ परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Improve relationship with Mother in Law : सासूसोबत नातं खुलवण्यासाठी ‘या’ गोष्टी आवर्जून करा; आई आणि सासूमध्ये फरकच कळणार नाही
Next G PAT 2022: फार्मसी पदवी प्रवेशांसाठी होणारी ‘जी-पॅट’ पुन्हा घेण्याची मागणी

Check Also

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …

आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Meteorological Department Recruitment: कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांनाच पाऊस नेमका कधी पडेल? याची …