आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Meteorological Department Recruitment: कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांनाच पाऊस नेमका कधी पडेल? याची माहिती हवी असते. आपण सर्व पावसाबद्दल विविध तर्क लावतो. पण आपल्याला पावसाचा नेमका अंदाज लावता येत नाही. अशावेळी आपण हवामान खात्यावर अवलंब हवामान खात्याच्या कामाविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. आता हवामान खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय हवामान विभाग अंतर्गत (Indian Meteorological Department) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट (Project Scientist) -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, रिसर्च असोसिएट (Research Associate), सिनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) आणि ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. याअंतर्गत एकूण १६३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रोजेक्ट सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ६० टक्के गुणांसह एमएससी इन ॲग्रीकल्चर मेट्रोलॉजी/ॲग्रीकल्चर फिजिक्सची डिग्री मिळविलेली असावी. किंवा उमेदवारांनी बीई/बीटेक पूर्ण केलेले असावे. उमेदवारांची वयोमर्यादा पोस्टनुसार ३५ ते ४५ वर्षे इतकी असेल.

रिसर्च असोशिएट पदासाठी अर्ज अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी/एमएससी किंवा त्या समकक्ष ॲग्रीकल्चर मेट्रोलॉजी/ ॲग्रीकल्चर फिजिक्स/ॲग्रीकल्चर स्टॅटिस्टिक्सची पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांची वयोमर्यादा पोस्टनुसार २८ ते ३५ वर्षे इतकी असेल.

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथील हवामान खात्याअंतर्गत काम करावे लागेल. ९ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Collector Office Job: जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षा न देता नोकरी, ४५ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …