लायगरच्या अपयशाचा विजय देवरकोंडाला बसला मोठा फटका, जन गण मन सिनेमाबाबत घेतला निर्णय

मुंबई : ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा याचे ग्रहमान सध्या फारसं बरं नाही. त्याची आणि अनन्या पांडे हिची प्रमुख भूमिका असलेला लायगर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून अपयशी ठरला. यामुळे निर्मात्याचं मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून विजयनं त्याच्या खिशातून काही कोटी रुपये भरल्याची बातमी आली. लायगर सिनेमाच्या अपयशानंतर विजयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या अपयशाचा फटका विजयच्या आगामी सिनेमांनाही बसला आहे. विजयनं त्याची प्रमुख भूमिका असलेला जन गण मन सिनेमाचं मानधन कमी करूनही तो डबाबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधी चेहरा झाला खराब आता पुन्हा बिघडली २८ वर्षीय प्रसिद्ध गायकाची तब्येत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) चा लायगर सिनेमा अपयशी ठरल्याच्या मोठा फटका जन गण मनला बसला आहे. सुत्रांनी सांगितलं की, लायगरचं सिनेमांचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनीच केलं होतं. तर जन गण मन सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांच्याकडेच होतं. या सिनेमाची घोषणा लायगरच्या आधीच झाली होती आणि हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असंही सांगितलं होतं.


निर्मात्यांना सोसावं लागलं मोठं नुकसान

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लायगर सिनेमानं संपूर्ण देशात पहिल्याच आठवड्यामध्ये ३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ही आकडेवारी निर्मात्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे. या सिनेमाचं बजेटच १०० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातआहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन पाहता ही मिळकत खूपच कमी आहे.

परी, दीपिका, चिंगीनंतर आता येतेय बयो, कोण आहे ही बालकलाकार?

विजयनं खिशातून भरले पैसे

लायगर सिनेमामुळे निर्मात्याचं जे नुकसान झालं ते विजय देवरकोंडानं त्याच्या खिशातून भरून काढलं. विजयनं त्याच्या कमाईतील काही हिस्सा निर्माती चार्मी आणि अन्य निर्मात्यांना देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम ६ कोटी रुपयांच्या आसपास आहे.


चाहते म्हणाले विजयनं घेतला योग्य निर्णय

विजय देवरकोंडा याच्या आगामी जन गण मन सिनेमाबाबत आता बातम्या समोर येत आहे. त्यावर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेन्ट करत आहेत. काही चाहत्यांनी विजयनं हा सिनेमा करू नये अशा कमेन्ट केल्या आहेत. तर काहींनी विजयचा हा सिनेमा करत नाही हा निर्णय चांगला असल्याचं म्हटलं आहे. तर काहींच्या मते विजयनं त्याच्या करीअरमध्ये घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय आहे.

‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनचं मानधन माहीत आहे? सलमानला देतोय टक्कर!

लायगर सिनेमाबद्दल सांगायचं तर विजय देवरकोंडानं एका फायटरची भूमिका साकारली होती. या सिनेमात विजयच्याबरोबरीनं अनन्या पांडे, रॉनित रॉय आणि राम्या कृष्णनन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमात माइक टायसन हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.


आता सामंथाबरोबर दिसणार विजय

विजय देवरकोंडा याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर तो तेलुगू रोमँटिक ड्रामा खुशीमध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर सामंथ रुथ प्रभू दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं चित्रीकरण काश्मीरमध्ये कऱण्यात आलं होतं.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

बिग बॉस मराठी 4 बद्दल महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, मी….

मुंबई,  07 सप्टेंबर :  प्रेक्षक अनेक दिवस ज्या शोची आतुरतेनं वाट पाहत आहेत तो शो …

विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता’; लग्नानंतर कतरिनाचा धक्कादायक खुलासा

मुंबई, 07 सप्टेंबर : कतरिना कैफ आणि विकी कौशल  हे बॉलीवूडमधील क्यूट कपल आहे. सगळीकडे …