PAK vs AFG : अफगाणिस्तानचा संघ असा खेळला तर भारताचा खेळ खल्लास, पाहा नेमकं काय केलं

दुबई : भारतीय संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये जाणार की नाही, हे अफगाणिस्तानच्या संघावर अवलंबून आहे. पण ज्यांच्यावर भिस्त आहे त्याच अफगाणिस्तानने असा खेळ केला तर भारताचा खेळ खल्लास होऊ शकतो.

अफगाणिस्तानने आजच्या सामन्यातत पाकिस्तानवर विजय साकारला तर भाराताचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार आहे. पण अफगाणिस्तानच्या संघाकडून निराशा झाल्याचेच पाहायला मिळाले. कारण पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पाकिस्तानला या सामन्यात जास्त धावांचा पाठलाग करावा लागणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचा संघ कशी गोलंदाजी करतो, यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. कारण अफगाणिस्तानला पाकिस्ताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १२९ धावाच करता आल्या आहेत.

या सामन्यात अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण ४३ धावांमध्येच त्यांना पहिले दोन फलंदाज गमवावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानचे एका मागून एक ठराविक फरकाने विकेट्स पडत गेले आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यातत सपशेल अपयश आहे. त्यामुळे आता हा सामना पाकिस्तानसाठी सोपा ठरू शकतो. पण दुसरीकडे अफगाणिस्तानची गोलंदाजी ही भेदक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचा संघ कशी गोलंदाजी करतो, यावर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खासकरून या सामन्यात रशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान कशी गोलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण या तिघांनी आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. त्यामुळे या सामन्यात ते कोणता चमत्कार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

पाकिस्तानकडून यावेळी हारिस रौफने दोन विकेट्स घेत अचूक गोलंदाजी केली. रौफला यावेळी प्रत्येक गोलंदाजांनी विकेट मिळवत चांगली साथ दिली. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजांना वाव असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचा संघ कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवरच आता भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

2 बॉल 2 सिक्स, थरारक सामन्यात पाकिस्तानचा विजय, भारताचं आशिया कपचं आव्हान संपलं!

शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) …

जगात कुणालाच जमलं नाही ते अफगाणिस्तानने केलं, नंबर वन बाबरची गोल्डन शिकार!

शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या (Pakistan vs Afghanistan) …