Video- हद्दच केली! प्रमोशनसाठी कधी चप्पल, रिक्षा तर बस, विजय देवरकोंडावर भडकले नेटकरी

मुंबई : दक्षिणेतील सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या आगामी ‘लायगर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच गर्क आहे. सिनेमाचं जिथं जिथं प्रमोशन होत आहे, तिथं तिथं विजय आणि अनन्या पांडे आवर्जून जातात. मग कधी ट्रेनने जातत. तर कधी रिक्षानं. विजयचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे. परंतु अनेकांच्या मते विजय त्याच्या सिनेमासाठी जे काही करत आहे तो फक्त दिखावा आहे. त्यामुळे रिक्षातून सिनेमाच्या प्रमोशनसाठी जेव्हा विजय गेला. तेव्हा त्याच्यावर अनेकांनी टीकात्मक कमेन्ट केल्या आहेत.

होत्याचं नव्हतं झालं! दारुत बुडाले राहत फतेह अली खान, Video Viral

मुसळधार पावसात रिक्षाचा आधार

लायगर सिनेमाच्या प्रमोशनसाठी विजय गेला तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे विजयनं त्याची आलिशान गाडी सोडून सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमाला रिक्षानं जाण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर विजयचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये विजयबरोबर आणखी एक व्यक्ती रिक्षात बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर खूपच चर्चेत आला. विजयच्या चाहत्यांनी त्यावर भरभरपूर लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी विजयच्या या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.


विजयवर होतेय टीका

विजयचा हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा खरा हिरो, ज्याच्याकडे कोणताही अॅटिड्यूड नाही, अत्यंत विनम्र असा अभिनेता असल्याचं अनेकांनी कमेन्टमध्ये म्हटलं आहे. तर अनेकांनी विजय हे सर्व काही प्रसिद्धीसाठी करत असल्याचं म्हटत त्याच्यावर टीका केली आहे. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘भावा, हा तर सर्व दिखावा आहे. रिक्षा, ट्रेन, चप्पल घालणं आता बंद कर.’ आणखी एक युझरनं लिहिलं आहे की, ‘किती खोटं प्रमोशन आहे.’


२५ ऑगस्टला सिनेमा होणार प्रदर्शित

दरम्यान विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघजण अनेक दिवसांपासून देशातील कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहेत. या दोघांशिवाय या सिनेमात माइक टायसन, विशु रेड्डी, राम्या कृष्णन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. धर्मा प्रॉडक्शनबरोबरच पुरी कनेक्ट्सनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

इतना क्यों सिखाई जा रही हो जिंदगी, गुलजारांच्या शायरी वाचल्या का?



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous होत्याचं नव्हतं झालं! दारुत बुडाले राहत फतेह अली खान, गायकाची आताची अवस्था पाहवणार नाही
Next मानसिक आरोग्यावर विराट कोहलीच्या विधानाने धक्का; म्हणाला, ‘…मला एकटेपणा जाणवतो’

Check Also

‘सुशांतची आत्महत्या नाही हत्याच’, आमिर खानच्या भावाचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर …

ठरलं! ‘या’ दिवशी येणार आयुष्मान खुरानाची ‘ड्रीम गर्ल 2’; इथं पाहा तारीख

मुंबई, 16 सप्टेंबर : 2019 मध्ये आलेला  ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात आयुष्मान …