१२० कोटी रुपयांचं बजेट असलेला लायगर बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांच्या आसपासच गल्ला जमवू शकला. लायगर सिनेमा अयशस्वी ठरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विजय आणि लायगर सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलं आहे.
हे वाचा-कार्तिक-कियाराची ‘सत्यप्रेम की कथा’, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या नवीन प्रवासाला सुरुवात
विजय आणि पुरी यांनी घेतला हा मोठा निर्णय
लायगर सिनेमा अपयशी ठरल्यानंतर विजयला त्याच्या आगामी ‘जन गण मन’ सिनेमाच्या यशाबद्दल धास्ती निर्माण झाली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही पुरी जगन्नाथच करत आहेत. लायगर सिनेमा बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्यामुळे जन गण मन सिनेमाच्या निर्मात्यांनाही धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळेच विजय आणि पुरी जगन्नाथ यांना निर्मात्यांचं नुकसान भरून काढायचं आहे. त्यामुळेच मीडिया रिपोर्टनुसार, विजयनं आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी जन गण मन सिनेमासाठी मानधन न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सिनेमाचं बजेट केलं कमी
सुत्रांच्यामाहितीनुसार जन गण मन सिनेमाचं बजेटही कमी करून ते जवळपास अर्ध करण्यात आलं आहे. केवळ इतकंच नाही तर सिनेमाच्या कथानकावरही पुन्हा विचार केला जात आहे. विजयच्या आधी या सिनेमात काम करण्यासाठी महेश बाबू याला विचारण्यात आलं होतं. परंतु काही कारणामुळे त्यानं या सिनेमात काम करण्यासाठी नकार दिला.
हे वाचा-ब्रह्मास्त्र प्रमोशनदरम्यान चर्चा आलियाच्या शराराचीच! बाळासाठी ड्रेसवर लिहिला खास संदेश
लायगर सिनेमाचं चित्रीकरण सुरू असतानाच जन गण मन सिनेमाची कथा विजयला ऐकवण्यात आली होती. त्याला ही कथा आवडल्यानं काम करायला त्यानं होकार दिला. जन गण मन पुढच्या वर्षी ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदीबरोबरच कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु भाषांत प्रदर्शित होणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या