देशातून गायब कसे झाले चित्ते? ७० वर्षांनंतर परतलेल्या उस्तादांबद्दल जाणून घ्या या सीरिजमधून!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला देशाला भेट म्हणून चित्ते दिले आहेत. भारतात आणि संपूर्ण देशामध्ये चित्त्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ७० वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा चित्ते दिसणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला आठ चित्ते नांबियामधून भारतात आणले. हे आठही चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले आहेत. या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात चित्त्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. हे कुतूहल शमवण्यासाठी ‘इंडियाज वाईल्ड लेपर्ड्स’ हा माहितीपट प्रत्येकानं बघायला हवा.

पत्नीच्या जाण्यातून सावरला नाही अभिनेता, एकट्यानेच सांभाळतोय मुलाला

काय आहे माहितीपटामध्ये

भारत ही वाघांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु ही भूमी गर्द जंगलामध्ये राहणाऱ्या चित्त्यांचीदेखील होती. नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर संदेश कादुर यांनी त्यांच्या इंडियाज वाइल्ड लेपर्ड्मध्ये चित्त्यांबद्दल अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

४४ मिनिटांचा आहे माहितीपट

या माहितीपटामधून कादूर यांनी अत्यंत मेहनत घेऊन आपल्या देशातील जंगलातील प्राण्यांच्या विश्वाचं चित्रीकरण केलं आहे. हा माहितीपट केवळ ४४ मिनिटांचा आहे. परंतु यात माहितीचा रंजक खजिना आहे. ही नॅशनल जिओग्राफीकल डॉक्युमेंट्री संपूर्ण कुटुंबाबरोबर एकत्र पाहण्यासारखी आहे.

कोण आहे देव चित्रगुप्त, ज्यांच्या अपमानामुळे ‘थँक गॉड’ होतोय बॉयकॉट

‘इंडियाज वाइल्ड लेपर्ड्स’बद्दल

या माहितीपटामध्ये अनेक रंजक, उत्कंठावर्धक गोष्टी आहेत. ज्या लोकांना वाघ, चित्ते आवडतात त्यांच्यासाठी हा माहितीपट म्हणजे खजिनाा आहे. हा माहितीपट डिन्सी प्लस हॉटस्टारवर बघता येईल. आफ्रिकन कॅट्स असं आधी याचं नाव होतं आता ‘इंडियाज वाईल्ड लेपर्ड्स’ असं त्याचं नाव आहे.

या माहितीपटामध्ये चित्त्यांबद्दल रंजक आणि मजेशीर माहिती दिली आहे. परंतु आपण त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, अथवा त्यांना प्राणीसंग्रहालयात बघितलं आहे. परंतु आता हे चित्ते आपल्या भारतात आले असून लवकरच ते सगळ्यांना पाहता येतील.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …