Goa Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यातील भाषणात काढली मनोहर पर्रिकरांची आठवण, म्हणाले…

गोव्याच्या सुवर्ण भविष्यासाठीची ही विकासाची यात्रा अशी सुरू राहील, असंही म्हणाले आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज(गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोव्यातील म्हापसा येथे सभा होत आहे. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण काढली. तसेच, १४ फेब्रवारी रोजी गोव्यातील प्रत्येक मतदार पुन्हा कमळ फुलवणार असल्याचं सागंत, भाजपाच्या उमेदवारांना त्यांनी मोठ्या विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ”गोव्याच्या भविष्य निर्माणासाठी निवडणुकीत दिवस-रात्र मेहनत करत असलेल्या भाजपाचे सर्व कार्यकर्ते, सहकारी आणि गोव्यातील बंधू-भगिनींनो नमस्कार. खरच गोव्यात तुम्हा सर्वांमध्ये येऊन माझ्यामध्ये एक नवी उर्जा निर्माण होते. इथल्या हवेची गोष्टच काही वेगळी आहे. गोवा एवढ्या बुलंद स्वरात विकास आणि भाजपाबाबत बोलत आहे, की तो आवाज दूरपर्यंत जात आहे. गोव्याने हे पक्क केलं आहे की, विकासाची ही लाट, सूशासनाच्या या लाटेचा वेग हळू होऊ द्यायचा नाही. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्वात गोव्याच्या सुवर्ण भविष्यासाठी विकासाची ही यात्रा अशी सुरू राहील.”

तसेच, ”१४ फेब्रवारी रोजी गोव्यात पुन्हा एकदा एक-एक मतदार कमळ फुलवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदान करणार आहे. मी गोव्यातील भाजपाच्या सर्व उमेदवारांना भव्य विजयाची खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, जेव्हा पण मी गोव्यात येतो तर माझे मित्र मनोहर पर्रिकरक यांची उणीव नेहमी भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमी खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल. मी भाजपाचे वरिष्ठ नेते दिवंगत फ्रान्सिस डिसुझा ज्यांच्योसोबत काम करण्याची देखील मला संधी मिळाली, यांच देखील स्मरण करतो.” असं यावेळी मोदी म्हणाले.

हेही वाचा :  अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या पतीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरलेली - Bolkya Resha

याचबरोबर, ”माझ्या आयुष्याच्या महत्वपूर्ण क्षणात गोव्याच्या भूमीला एवढं निर्णायक बनवलं, तुम्ही आज मला ज्या रूपात पाहात आहात, जिथे मला पाहात आहात त्याची सुरूवात गोव्यातूनच झाली होती. जून २०१३ मध्ये इथे भाजपाची कार्यकरिणीची बैठक होती आणि तेव्हा मी गोव्याच्या याच भूमीवर होतो, तेव्हा भाजापने मला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्य प्रचार समितमीचा प्रमुख म्हणून घोषित केलं होतं. नंतर मला पंतप्रधान पदाची उमेदवार म्हणून देखील घोषित करण्यात आलं होतं. तेव्हा मनोहर पर्रिकर यांनी माझी एक सभा आयोजित केली होती, तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द निघाला होता, तो शब्द होता काँग्रेसमुक्त भारत हा शब्द गोव्यातील भूमीवरच माझ्याकडून सहजपणे निघाला होता आणि आपण पाहीलं आज हा शब्द देशातील कोट्यावधी नागरिकांचा संकल्प बनला आहे. ” असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

याचबरोबर मोदी म्हणाले, ” मित्रांनो गोव्याची एक विशेष संस्कृती आणि ओळख आहे आणि गोवा सर्वांना सोबत घेऊन देखील चालतो. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीची काळजी नाही, त्यांनी गोव्याला आपल्या भ्रष्टाचाराचा, लुटमारीचा एक फार मोठा एटीएम बनवून ठेवलं होतं. मात्र भाजपाने गोव्यासाठी स्वयंपूर्ण गोव्याचा मंत्र दिला. भाजपाने समग्र विकासाची चर्चा केली, सर्वांसाठी सारख्या विकासाबद्दल बोललं. कारण, विकासाला तुकड्यांध्ये जाती, धर्म, मत, मजहब, भाषा, क्षेत्राच्या नावावर विभागलं नाही जाऊ शकत. जर उत्तर गोव्यााच विकास झाला, तर दक्षिण गोवा देखील पुढे जाईल. जर दक्षिण गोव्यात काम होईल, तर उत्तर गोव्यास देखील त्याचा फायदा मिळेल. अशाच प्रकारे जर आपण गोव्याच्या पर्यटनाबाबत बोलायचं म्हटलं तर, त्यासाठी गोव्याला प्रत्येक क्षेत्रात विकासाची आवश्यकता आहे. जर इथे चांगले रस्ते बनले नाहीत, नव्या सुविधा निर्माण झाल्या नसत्या तर पर्यटकांनी इथे येणं पसतं केलं असतं का? कोणी पर्यटक आले असते का? इथली परिस्थिती जर वाईट असती तर कोणी इथे आलं असतं का? यासाठी भाजपा सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासाचं नवं अभियान चालवलं आहे.यामुळे देश आणि जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतील आणि येथील पर्यटनास गती देतील”

हेही वाचा :  बूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …