प्रसाद खांडेकरने ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्याच्यासोबत या नाटकात हास्यजत्रेचेच कलाकार , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे हे प्रमुख भूमिकेत आहेत. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डमध्ये या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुर्रर्र नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने गेल्या दोन वर्षातील आठवणी शेअर केल्या. “जसा बाळाचा जन्म हा नऊ महिन्यांचा प्रवास असतो, ती एक अनुभूती असते. बाळ अजून पोटातच असलं तरी ते आपल्या सोबत आहे अशी जाणीव होत असते. अगदी तसच कुर्रर्र या नाटकाचा विषय माझ्या डोक्यात घोळत असल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत मी या नाटकाची बाळासारखी वाट बघत होतो” असं प्रसादने त्याच्या कुर्रर्र नाटकाचं आणि त्याचं नातं सांगितलं.
हेहा वाचा – Narendra Modi Birthday :’राम, कृष्णा आणि गांधींसारखे तुम्ही अमर आहात’; कंगनाच्या मोदींना खास शुभेच्छा
पुढे प्रसाद म्हणाला, “खरंतर हा विषय बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात घोंगावत होता. लग्नानंतर किती दिवसात एखादं जोडपं गोड बातमी देतं यावर त्यांच्या वैवाहिक नात्याची खुशाली अवलंबून असते हे समाजातील एक चित्र आहे. त्यांना थोडा वेळ द्यावा, किंबहुना बाळ कधी जन्माला घालायचं हा निर्णय सर्वस्वी त्या दोघांचाच असायला हवा इतकं स्वातंत्र्य खूप कमी कुटुंबातील जोडप्यांना मिळतं. यावर काही विनोदाची पेरणी करून हलके चिमटे काढता येतील का हा विचार होता. विचार कृतीत येण्यासाठी लॉकडाऊनचा काळ मिळाला. कोरोनाकाळात घरी निवांत असताना या नाटकाने माझ्या डोक्यातून संहितेच्या, संवादाच्या रूपाने आकार घेतला. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं ते विशाखा सुभेदार हिने निर्मितीची धुरा घेतल्यामुळेच.”
प्रसाद खांडेकर उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. हास्यजत्रेचे स्कीटसुद्धा अनेकवेळा तोच लिहितो. अशा या कलाकाराला त्याच्या कामाची योग्य पोचपावती मिळाली आहे. याव्यतिरिक्त प्रसादची ‘मिया बिवी और मर्डर’ ही पहिलीवहिली वेब सीरिज एमएक्स प्लेअरवर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये प्रसाद एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रसादने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या सीरिजमध्ये त्याने राजीव खंडेलवाल, मंजिरी फडणीस, रुशद राणा यांच्यासह स्क्रीन शेअर केली आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या