विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सारा अली खान आणि करण जोहर मुंबई विमानतळावरून हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही पापाराझींसोबत मजेशीर संवाद साधताना दिसतात. एअरपोर्टवर पॅप्स पाहून करण जोहर म्हणतो, तुम्ही साराची कविता ऐकली पाहिजे. यावर सारा म्हणते ‘इन फ्रन्ट ऑफ करण जोहर साराज शायरी इज ओव्हर’. त्यानंतर करण म्हणतो, ‘कोण बनेल साराचा नवरा’. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. एका मीडिया यूजरने लिहिले की, करण जोहर खूप मजेदार आहे. आणखी एका युजरने लिहिले, सारा क्यूटी आहे. सारा, शायरी आणि पती. दुसर्या यूजरने लिहिले, शुभमन गिल आहे का?, वाह, शुभमन आणि साराची जोडी छान दिसेल’.
हेही वाचा – Kartik Aaryan ला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की….; पाहा VIDEO
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनाही दुबईमध्ये डिनर करताना एकत्र स्पॉट केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. शुभमनच्या पहिले साराचं नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या