ज्विगाटो सिनेमाचं दिग्दर्शन नंदिता दासनं केलं आहे. कपिल शर्माशिवाय यात शहाना गोस्वामीही आहे. सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात कपिलपासूनच होते. तो एका अपार्टमेंटमध्ये पोहोचतो. तिथे पिझा डिलिव्हर करतो. दरम्यान, तो मेमोही वाचतो. त्यात लिहिलं असतं डिलिव्हरी बाॅयनी लिफ्ट वापरू नये. तो जिने चढून वर जातो. तिथे एक जण दारूच्या नशेत पडलेला दिसतोय.
‘सुंदरा मनामध्ये भरली’मधली चिमुरडी लतिका देणार परीला टक्कर, सोशल मीडिया
कपिल म्हणतोय, तो आज १० डिलिव्हरी करेल. पण अनेकदा त्या रद्द होत असतात. कपिल आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीय. पत्नी, मुलगा समजून घेतायत.
काय आहे ज्विगाटोची कथा?
सिनेमाची कथा एका फ्लोअर मॅनेजरची आहे. करोना महामारीत त्याची नोकरी जाते. त्यानंतर तो फूड डिलिव्हरीचं काम करायला लागतो. तो फक्त रेटिंग आणि इनसेंटिव्हजच्या मागे फिरत असतो. घर खर्च चालवायला त्याची पत्नीही मदत करतोय. मध्यमवर्गाचं आयुष्य आणि डिलिव्हरी बाॅयचं दु:ख सिनेमात दाखवलंय.
Zwigato चं सुरू आहे कौतुक
कपिल शर्माचा हा नवा अवतार चाहत्यांना आवडला आहे. ट्विटरवर त्याचं कौतुक सुरू आहे. नंदिता दासनं सिनेमाची संकल्पना चांगली उभी केली आहे. करोना काळात अनेक जणांना या अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.
महेश मांजरेकरांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमातून काढता पाय घेतला?
‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या