कपिल शर्माच्या मंचावर रणवीरच्या न्यूड फोटोशूटची खिल्ली,म्हणे कपडे द्यायला उशिर..

मुंबई, 10 सप्टेंबर:  टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो द कपिल शर्मा शो 10 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. प्रेक्षक या शोची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा शो पुन्हा सज्ज झाला आहे.  कपिल शर्माच्या शोच्या पहिल्याच आठवड्यात अभिनेता अक्षय कुमार आणि रकुल प्रित सिंह यांची हजेरी लावली आहे. शोमध्ये आलेले कलाकार सोडून विनोदवीरांनी मात्र थेट अभिनेता रणवीर सिंहवरच निशाणा साधला आहे.  कपिल शर्मा शोचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात कीकू शारदा रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची खिल्ली उडवताना दिसत आहे.

कपिल शर्मा शोच्या प्रोमोमध्ये कीकू शारदा स्री वेशात दिसत आहे. ती एका धोबीच्या भूमिकेत आहे. शोमध्ये आलेल्या कलाकरांना विनोदवीरांनी अनेक भन्नाट प्रश्न विचारुन पोट दुखेपर्यंत हसवलं. अशातच कीकूनं अक्षयाला एक प्रश्न विचारला ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  कीकू शारदा अक्षयला प्रश्न विचारतो, तो म्हणतो, अक्षय कुमार रणवीर सिंह तुमचा मित्र आहे का? त्यावर अक्षय मान हलवत हो म्हणतो. त्यावर किकू म्हणतो, रणवीरला आमच्याकडून सॉरी सांगा. काय झालं ना आमच्याकडून त्यांना कपडे द्यायला उशिर झाला त्यामुळे कोणी तरी त्यांचे विनाकपड्यांमध्येच फोटो काढून गेलं.  किकू शारदाच्या या पंचनं कपिल शर्मासह सेटवरचे सगळेच कलाकार आणि टीम हसून हसून लोटपोट झाले. प्रेक्षकांनाही हा प्रोमो पाहून हसू आवरलेलं नाही.

हेही वाचा – Jubin Nautiyal: जुबिन नौटियालवर संतापले लोक, होतेय अटकेची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

 अभिनेता रणवीर सिंहनं एका प्रसिद्ध मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं. रणवीरचं हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.  अनेकांनी त्याचं कौतुक केलं मात्र मोठ्या प्रमाणात त्याला टीकेला समोरं जावं लागलं. रणवीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला संघटनेकडून रणवीरनं महिलांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याच्यावर करण्यात आला.  रणवीरनं न्यूड फोटो सोशल मीडियावरून डिलीट करावे अशी मागणी करण्यात आली.

बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट, अर्जुन कपूर, परिणीता चोप्रा, प्रियंका चोप्रा, अनुराग कश्यप सारख्या अनेक कलाकारांनी रणवीरला न्यूड फोटोशूट प्रकरणी सपोर्ट केला होता. तसंच पत्नी दीपिका पादुकोण हीनं देखील नवऱ्याला मोठा सपोर्ट केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट

मुंबई, 10 सप्टेंबर-   आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज …

‘मी स्टार किड्समध्ये टॅलेंट शोधतो पण…’; करण जोहरची खंत

मुंबई, 10 सप्टेंबर :  अभिनेता रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिल यांचा अमेझॉनवर सुरू …