यामुळे पुरुषत्व कमी होत नाही! गुलाबी रंगाच्या त्या टीशर्टमधील कपिल शर्माची पोस्ट व्हायरल

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यानं स्वतःमध्ये वाखाण्याजोगे बदल घडवून आणले आहेत. त्याच्यामध्ये घडून आलेल्या या बदलाचे फोटो कपिलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यानंतर चाहत्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कपिल कॅनडा आणि अमेरिका दौऱ्यावरून परत आला आहे. लवकरच त्याचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकही त्याच्या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट बघत आहेत.

हे वाचा-‘सूर्यवंशी’मधील अभिनेत्री दिसणार बिग बॉस मराठीमध्ये; चौथ्या सीझनसाठी विचारणा

कपिलनं काही दिवसांपूर्वी ब्लॅक अँड व्हाईट कपडे घालून फोटोशूट केलं होतं.त्याला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता कपिलनं गुलाबी रंगाचा शर्ट घालत केलेल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. कपिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याचा वेगळाच अंदाज दिसत आहे. डोळ्यांना गॉगल, त्याचा नवीन हेअर कट आणि दाढीमधील त्याचा हा स्वॅग चाहत्यांना खूपच आवडला आहे.

एकदम कम्माल अशा अंदाजातील हा फोटो शेअर करत त्यानं नोट लिहिली आहे. त्या नोटची देखील फोटोंइतकीच चर्चा आहे. विशेष म्हणजे कपिलनं या फोटोमध्य तमन्ना भाटिया हिला टॅग केलं आहे. कपिलनं लिहिलं आहे की, ‘ तमन्ना भाटिया मी आत्ताच गुगलवर मुलं गुलाबी रंगाचे कपडे घालू शकतात का, असं सर्च केलं. तुम्ही बरोबर वाचलं. खरे पुरुष गुलाब रंगाचेच कपडे घालतात. गुलाबी रंग हा मुलांसाठी देखील कूल असतो. गुलाबी रंगाचा इतिहास हा केवळ महिलांशीच संबंधित नाही. १८ व्या शतकामध्ये पुरुष देखील गुलाबी रंगाचे सूट घालाचे. त्यावर फुलांची नक्षी असायची. त्यामुळे खरे पुरुष गुलाबी रंगाचे कपडे घालतात. गुलाबी रंगाचे कपडे घातल्यामुळे तुमचं पुरुषत्व कमी होत नाही.’


कपिलनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर खूप कमेंट्स केल्या आहेत. अनेक कलाकारांनी देखील कपिलचं कौतुक कलं आहे. अभिनेता करणवीर बोहरा यानं लिहिलं आहे की, ‘पाजी, तुमच्या या अनोख्या लुकमुळे सर्वांना गुंगवूनच टाकलं आहे.’ अर्चना पूरण सिंहनं लिहिलं आहे की, ‘अखेर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये जे हॉट गुलाबी रंगाचे कपडे तू घातले होते. त्यामध्ये तू कम्माल दिसत होतास. तुझा हा लुक माझा खूप आवडता आहे. मी गिन्नीला मेजेज करू तसं सांगितलं आहे. कारण तिच तुझी स्टाईल करत आहे. प्लीज आता तुझी स्टाईलिस्ट बदलू नकोस हं.’

हे वाचा-फेसबुक पोस्टमुळे ट्रोल झालेली केतकी चितळे, आता सोशल मीडियावरच होतंय कौतुक

क्रिकेटिअर हरभजन सिंह यानं देखील कपिलच्या या लुकवर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं आहे की, ‘क्या बात है…एकदम हिरो लुक. अक्षय कुमार देखील तुझ्यापुढे फेल होईल. एकदम किलर लुक.’ एका चाहत्यानं कॉमेन्ट लिहिली आहे की, ‘कपिल पाज तु्स्सी ग्रेट हो.’ कपिलच्या अनेक चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला हँडसम, सुंदर म्हटलं आहे. कपिल शर्माच्या आधी तमन्ना भाटिया हिनं सोशल मीडियावर ब्लश गुलाबी रंगाच्या आऊटफिटमधले काही फोटो शेअर केले होते.

लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन


कपिल शर्माच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच द कपिल शर्मा शो चं चौथं पर्व प्रसारित होणार आहे.या कार्यक्रमात कपिलबरोबर अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. त्यामध्ये कॉमेडियन सिद्धार्थ सागर, श्रीकांत मस्की यांचा समावेश आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous थरार, गूढ आणि ॲक्शन! ‘कालसूत्र’ची अंगावर काटा आणणारी झलक, दिसणार मराठीतील दिग्गज कलाकार
Next शाहरुखनंतर मीच सुपरस्टार म्हणणाऱ्या विजयला नेटकऱ्यांनी फटकारलं; बॉयकॉट ट्रेंडमध्ये ‘लायगर’ही आपटला

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …