कपिल शर्माला मोठा धक्का,आणखी एका कलाकारानं सोडला शो

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) चं नवीन पर्व सुरू होत आहे. या कार्यक्रमात जुन्या कलाकारांबरोबरच काही नवीन कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. परंतु कार्यक्रमाच्या नवीन पर्वात भारती सिंग, कृष्ण अभिषेक यांच्यासारखे दमदार कलाकारांची उणीव प्रेक्षकांना जाणवणार हे नक्की. कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. कार्यक्रमात अनेक विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) देखील कार्यक्रमाचं नवीन पर्व सुरू होण्याआधी बाहेर पडला आहे. खुद्द चंदन प्रभाकरनं एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. याआधी कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. कृष्णा आणि निर्मात्यांमध्ये मानधनावरून बिनसल्यानं त्यानं हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

चंदन प्रभाकर यानं पिंकविला संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘द कपिल शर्मा कार्यक्रमाच्या आगामी पर्वात मी सहभागी होणार नाही. या मागे काही कारण नाही. फक्त मला एक ब्रेक हवा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.’ द कपिल शर्मा शो च्या आगामी भागामध्ये चंदन प्रभाकर सहभागी होणार नसल्यानं प्रेक्षकांची मोठी निराशा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे द कपिल शर्मा शो कार्यक्रमाच्या नवीन पर्वाचा प्रोमो जेव्हा शूट झाला तेव्हा चंदन त्यात सहभागी झाला होता. आता हा कार्यक्रम येत्या शनिवारपासून टीव्हीवरून प्रसारित होण्याआधीच त्यानं ही घोषणा केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

कपिलबरोबर अनेक वर्षे केलंय काम
चंदन प्रभाकर हा अनेक वर्षांपासून द कपिल शर्मा शो मध्ये काम करत होता. तो आणि कपिल लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. कार्यक्रमात दोघांमध्ये लुटपुटीचे वाद व्हायचे. ते प्रेक्षकांनाही खूप आवडायचे. अनेक वर्षे दोघांनी एकत्र काम केलं आहे. चंदनशिवाय भारती सिंग देखील या कार्यक्रमात कायमस्वरुपी सहभागी होणार नसल्याचं समोर आलं आहे.

व्यक्तिरेखेनुसार भारती दिसणार कार्यक्रमात
‘द कपिल शर्मा शो’मधून मी छोटासा ब्रेक घेतला आहे. मी सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स ९ कार्यक्रम करत आहे. त्यामुळे मला कार्यक्रमात नियमितपणं सहभागी होता येणार नाही. त्यात माझं बाळ लहान आहे आणि इतर काही कार्यक्रमासाठी मी कमिटमेंट दिल्या आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार मी सहभागी होईन, असं मत भारती सिंगनं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …