अभिनयाबरोबरच भार्गवी सोशल मीडियावरही सक्रीय असते. तिच्या कामासंदर्भातील नवीन नवीन माहिती ती चाहत्यांना देत असते. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो देखील ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. अलिकडेच भार्गवीनं तिच्या नवीन लुकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यात भार्गवी एकदम वेगळी दिसत आहे. भार्गवीनं नवीन हेअरकट केला असून त्यात ती आधीपेक्षा एकदम वेगळी तर दिसत आहे. शिवाय तिचं सौंदर्य त्यात अधिकच खुलून आलं आहे.
भार्गवीनं तिच्या नवीन लुकमधील फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा वर्षाव केला आहे. चाहत्यांबरोबरच अनेक अभिनेत्रींनाही भार्गवीचा हा नवीन लुक खूपच आवडला आहे. भार्गवीच्या या नवीन अंदाजावर मंजिरी ओक, क्रांती रेडकर, नंदिता पाटकर, अश्विनी कासार, सुकन्या मोने,मनवा नाईक, ऋतुजा बागवे, मानसी नाईक, शिवानी बावकर यांना देखील कॉमेन्ट करायचा मोह आवरला नाही.
भार्गवीच्या कामाबाबत सांगायचं तर, ती सध्या ती कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिका उत्कंठावर्धक असून त्यात भार्गवीनं मुलीबद्दल अत्यंत पझेसिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि धाकात ठेवणाऱ्या आईची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील भार्गवीच्या कामाबद्दल तिचं कौतुकही केलं जातं आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या