‘तो कसला पाहुणा?; नेमकं कोणाबाबत बोलतेय कुंजिका काळविंट

मुंबई, 8 सप्टेंबर-  अजूनही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनी हा सण अगदी उत्साहात साजरा केला आहे. घरगुती गणपतींचं विसर्जनदेखील करण्यात आला आहे. दरम्यान आता ‘ती परत आलीये’ मालिकेतील अभिनेत्री कुंजिका काळवींटने आपल्या घरातील बाप्पाची झलक शेअर करत एक इमोशनल पोस्ट लिहली आहे.

अभिनेत्री कुंजिका काळवींट ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ या मालिकेने तिला खास ओळख मिळवून दिली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. या हॉरर मालिकेतील तिची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. सुरुवातीपासून मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणाऱ्या आणि मालिकेच्या शेवटी अचानक तीच खलनायिका असल्याच्या ट्विस्टने सर्वांनाच चकित केलं होतं.

कुंजिका काळवींट इन्स्टाग्राम पोस्ट-
”इतर देव-देवंतांमध्ये सगळ्यात लाडका कोण असेल तर तो माझा गणपती बाप्पा ! लहानपणापासूनच एक वेगळ्याच प्रकारची आपुलकी आणि जिव्हाळा वाटत राहिला आहे. अगदी आईकडे हट्ट करावा इतकी जवळीक नेहमीच ह्याच्या समोर हात जोडताना वाटते. त्याने नकळतच आपल्यावर कृपा-दृष्टी ठेवावी आणि आपल्याकडून ते ५ दिवस अगदी उत्साहाने सेवा करून घावी अशी काहीतरी अजब जादू आहे बाप्पाची. उगाच “गणू” बाप्पा असा एकेरी संबोधलं जात नाही !

(हे वाचा:Bhargavi Chirmuley: मराठमोळ्या भार्गवी चिरमुलेचा नवा LOOK चर्चेत; शॉर्ट हेअरने वेधलं लक्ष )
अगदी आगमनाआधी पासून त्याच्या आसनाची सजावट, मोदकांची तयारी, नातलग, आप्तेष्ट दर्शनास येणे, भक्ती भावाने ताल लयीत म्हटलेल्या आरत्या, रोज होणारी षोडशोपचारी पूजा- अर्चा, नैवद्य समर्पण, फुलांची सजावट, धुपाचा मोहक सुगंध या सगळ्यांमुळे ते दिवस.”अक्षरशः मंत्रमुग्ध असतात.सर्व काही त्याच्या चरणी समर्पित…त्याचंच आहे सगळं!! तो कसला पाहुणा? आपणच इथले पाहुणे…तो तर स्वामी इथला.!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

हृतिक सैफची धमाकेदार एक्शन; विक्रम वेधाचा ढासू ट्रेलर आऊट

मुंबई, 08 सप्टेंबर : गेली अनेक दिवस ज्या सिनेमाची तूफान चर्चा होती त्या ‘विक्रम वेधा’ …

Santosh Juvekar चा नवा प्रोजेक्ट लवकरच येणार भेटीला; समोर आलं फर्स्ट पोस्टर

मुंबई, 8 सप्टेंबर : देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच …