एचपीसीएल अंतर्गत एकूण १०० शिकाऊ पदांसाठी (HPCL recruitment 2022) भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. याअंतर्गत इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation), केमिकल (Chemical), इलेक्ट्रिकल (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), कॉम्प्युटर सायन्स (Computer Science), सिव्हिल इंजिनीअरिंग (Civil Engineering), मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे (Mechanical And Electrical Engineering) विद्यार्थी संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.mhrdnats.gov.in वर जाऊन सरकारी नोकरीसाठीअर्ज करू शकतात.
उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना (Government Job 2022)दरमहा २५ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. उमेदवारांना १ वर्षाच्या कालावधीसाठी या पदांवर नियुक्त केले जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
उमेदवारांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा