IND vs SL, 1st T20: नुकतंच भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामना खेळण्यासाठी येणार आहे. दरम्यान तीन टी20 मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे. दरम्यान संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता असेल. तसंच आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा संघ तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
कुठे खेळवला जाणार सामना?
पहिला टी-20 सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
कधी खेळवला जाणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना 24 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, कामिल मिश्रा, जनिथ लियानागे, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महेश दीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डेनियल.
भारताचा टी-20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोद, रवींद्र चहल यादव, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

