IBPS PO मुख्य परीक्षेचे स्कोअर कार्ड जाहीर, ‘येथे’ करा डाउनलोड

IBPS PO Mains Score Card: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection,IBPS) द्वारे स्कोअर कार्ड जाहीर करण्यात आले आहे. आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षा २०२२ (IBPS PO Mains 2022) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांचे स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाहीर करण्यात आले आहे.

आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसरची मुलाखत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे. IBPS प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या पदांसाठी घेतलेल्या मुख्य परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार त्यांचे विभागवार गुण IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. ४,१३५ प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी मुख्य परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आली होती. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखत फेरीला उपस्थित राहण्यास पात्र असतील. IBPS PO मुलाखत फेब्रुवारी किंवा मार्च २०२२ मध्ये होणार आहे.

IBPS PO Mains Score Card: असे करा डाउनलोड
आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा २०२२ चे स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप १ : आयबीपीएस पीओ मुख्य स्कोअर कार्ड २०२२ डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप २: IBPS PO २०२१-२२ मुख्य परीक्षेचे स्कोअरकार्ड आणि गुण या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: तुमचा आयबीपीएस पीओ मुख्य स्कोअरकार्ड २०२२ पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक, रोल नंबर आणि पासवर्ड/जन्म तारीख भरा.
स्टेप ४: आता स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा.
स्टेप ५: तुमचे स्कोअर कार्ड आणि गुण स्क्रीनवर दिसतील.
स्टेप ६: भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्डची प्रिंट आउट घ्या.

हेही वाचा :  टीइटी गैरव्यवहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

Army ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
मुलाखतपत्र जाहीर
आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षेत (IBPS PO Mains Exam)उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखतीसाठी प्रवेशपत्र (IBPS PO Interview Latter) डाउनलोड करू शकतात. आयबीपीएस पीओ मुलाखतीचे प्रवेशपत्र ३ मार्च २०२२ पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असेल. या रिक्त पदांद्वारे, प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण ४,१३५ पदांची भरती केली जाणार आहे.

आयबीपीएस पीओ भरती २०२१ मुलाखत १०० गुणांची असेल. मुलाखतीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किमान ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे वेटेज रेशो ८०: २० असेल.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
या पदांसाठी भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, एकूण ४,१३५ रिक्त जागा भरल्या जात आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी १६०० जागा ठेवण्यात आल्या आहेत. तर ओबीसी उमेदवारांसाठी ११०२ जागा, एससी प्रवर्गासाठी ६७९ जागा, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० जागा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गासाठी ४०४ जागा राखीव आहेत.

हेही वाचा :  केंद्राकडून दर महिन्याला १६ लाख रोजगार उपलब्ध होतायत, रेल्वेमंत्र्यांनी केला दावा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Recruitment: ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती
TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध पदांची भरती

Army Ordnance Corps Invites Application From 1793 Eligible Candidates For Tradesman Mate & Fireman Posts. …

भारतीय नौदलात ट्रेड्समन पदांची भरती

Indian Navy Invites Application From 248 Eligible Candidates For Tradesman Posts. Eligible Candidates Can Apply …