कर्करोग समूळ नष्ट करण्यासाठी महिलांनी तपासणीकडे दुर्लक्ष करू नये, ठरेल घातक

भारताच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेमधील सर्वाधिक मोठे संकट म्हणून स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ओळखला जातो. या दोन्हींचा आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम झाला आहे. या आजारावरील उपचारांचा खर्च जास्त आहे आणि सर्वसाधारण भारतीय कुटुंबांसाठी ती एक मोठी आर्थिक चिंता असते. कर्करोगावरील रुग्णालयातील उपचारांसाठीचा खर्च मग बऱ्याचदा कर्ज, मालमत्ता विक्री किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून घेतलेल्या आर्थिक मदतीतून केला जातो. विकसित देशांच्या तुलनेत भारतीय महिलांचा ज्यामुळे अकाली मृत्यू ओढवतो आणि आयुष्याची भरभरून जगण्याची वर्षे वाया जातात अशा भारतीय स्त्रियांशी निगडीत सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांविषयी या लेखातून आम्हाला माहिती करून द्यायची आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सचे संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख आणि व्हायरोलॉजिस्ट डॉ. व्ही रवी यांच्याशी आम्ही बातचित केली. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक​

​स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक​

जागृतीचा अभाव, साक्षरतेची कमी पातळी, सामाजिक असमानता, सामाजिक प्रतिष्ठेचा केलेला प्रश्न आणि गरीबी यासारखे अनेक घटक भारतातील कर्करोगाच्या वाढत्या संख्येसाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसरा सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे.

हेही वाचा :  'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहून, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला

​महिलांमध्ये जागृतीचा अभाव​

​महिलांमध्ये जागृतीचा अभाव​

तथापि, भारतीय समाजात या दोन्हीसाठी जागरूकता पातळी खूपच कमी आहे. स्त्रियांना कॅन्सरची प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे याबद्दल माहिती मिळाली आणि लवकर निदान होण्याचे महत्त्व समजावून सांगितले तर आरोग्यसेवेत पडणारे अंतर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कर्करोगाच्या वाढीला वेळेवर प्रतिबंध होऊ शकतो.

(वाचा – कॅन्सरची जागरूकता होणे आवश्यक, एमओसीमधील तज्ज्ञांकडून मिळेल योग्य मार्गदर्शन)

​तपासणी करणे गरजेचे​

​तपासणी करणे गरजेचे​

सर्वसाधारण आरोग्यसेवेतील एक आवश्यक घटक म्हणजे कर्करोग तपासणी. कर्करोगाच्या घातक पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याआधी कर्करोगाचा शोध घेणे आणि शरीरातून पूर्णपणे काढून टाकणे ही सर्वात चांगली पद्धत आहे. पण याउलट, अनेक भारतीय महिलांना नियमित तपासणीचे महत्त्व माहीत नसते. त्यामुळे आजाराचे निदान उशीरा होते आणि उपचार मिळायला उशीर होऊ शकतो.

(वाचा – ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि जन्मजात हृदयरोग यांच्यातील संबंध नक्की काय, तज्ज्ञांकडून माहिती )

​लवकर निदान होणे आता झाले आहे सोपे​

​लवकर निदान होणे आता झाले आहे सोपे​

आज अनेक तपासणी पद्धती विकसित झाल्या असून स्त्रियांचे स्वास्थ्य, त्यांना हवा असलेला मोकळेपणा, सहजता या तपासणी पद्धतींच्या केंद्रस्थानी आहे. काही स्त्रियांना कर्करोगासाठीची तपासणी दवाखान्यात जाऊन करायला, त्यांची तपासणी दुसऱ्या कोणी करण्यात एक अवघडलेपण वाटते. त्यांना कर्करोगासाठीची तपासणी स्वत:ची स्वतः करायची असते. त्यासाठी त्यांना सहज सुलभपणा आणि गोपनीयतेची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय स्वयं-नमुने घेण्याच्या पद्धतींनी घरगुती पातळीवर अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. आरोग्यसेवा एवढी सोपी झाली आहे. तथापि त्यासाठी योग्य तंत्र जाणून घेणे, तपासणी नीट केली आहे ना हे पाहणे आणि डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा यासह स्वयं-तपासणी योग्यरित्या कशी करावी हे स्त्रियांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे.

हेही वाचा :  Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

​स्वतपासणी करणे आवश्यक​

​स्वतपासणी करणे आवश्यक​

स्व-तपासणी, जसे की स्तनाची स्वयं-तपासणी करणे हे स्त्रियांना त्यांच्या शरीराशी परिचित होण्यास आणि कर्करोगाचे संकेत देणारे कोणतेही बदल किंवा विचित्र वेगळेपणा ओळखण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे, एचपीव्ही डीएनए चाचणी ही लक्षणे नसलेल्या अवस्थेत गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे उच्च-जोखीम जीनोटाइप शोधण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

(वाचा – जमिनीवर बसून जेवण्याचे आहेत Weight loss सह जबरदस्त फायदे, डायनिंग टेबलजवळ बसणं ठरतंय घातक)

​प्राथमिक तपासणीवर जोर​

​प्राथमिक तपासणीवर जोर​

अनेक वर्षांपासून, जागतिक आरोग्य संघटने (WHO) सह अनेक एजन्सींनी कर्करोगापूर्वीच्या पेशींचे निदान आणि उपचार करण्यासाठी प्राथमिक तपासणीच्या महत्त्वावर जोर दिला आहे. तेव्हा उपचार सर्वात प्रभावी असतात आणि कर्करोगातून वाचण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही २०३० पर्यंत गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग निर्मूलनासाठी 90:70:90 च्या जागतिक धोरणाचा भाग म्हणून तपासणीची आवश्यकता आणि SDG उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक असल्याचे समर्थन केले आहे.

​पुढे वाटचाल करताना​

​पुढे वाटचाल करताना​

भारतीय महिलांना नियमित कर्करोग तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि भारतातील कर्करोग रूग्णांसाठीच्या आरोग्यसेवेतील अंतर कमी करण्याकरता शिक्षित करण्यासाठी कटिबद्ध होऊ यात. कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे, नियमित तपासणीचे महत्व आणि उपचारांच्या पर्यायांच्या श्रेणीबद्दल जनजागृती मोहिमेद्वारे माहिती देऊन हे साध्य केले जाऊ शकते. कर्करोगाचा धोका कमी करून निरोगी जीवनशैली राखण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे आणि समुपदेशन आणि सहाय्यता गटांच्या माध्यमातून पाठबळ पुरविणे यातून स्त्रियांना कर्करोगाचे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक परिणाम व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते. ही पावले उचलून भारतीय महिलांमध्ये जागरूकता वाढवणे आणि कर्करोगाविरुद्ध लढण्यास मदत करणे शक्य आहे.

हेही वाचा :  कर्करोगासाठी वरदान ठरतेय टार्गेटेड थेरपी, काय आहे नक्की ही थेरपी

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …