Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Viral Massage Fact Check: सोशल मीडियाचा आवाका वाढल्यानंतर अनेक फेक न्यूज (Viral Fake News) आणि फेक मॅसेजेच दररोज हजारोंच्या पटीने व्हायरल होत असतात. त्यातील काही मॅसेजेस तुमच्यावर थेट परिणाम करतात. मॅसेजवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर गंभीर दावे देखील केले जातात. अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. व्हायरल मॅसेज मागे दावा आहे की, मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा केल्यानं सगळ्यांचीच चिंता वाढलीये. हा दावा आरोग्याशी निगडीत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

WHO च्या म्हणण्यानुसार, मोबाईलमधून आरएफ रेडिएशन (Mobile Radiation) निघत असतं. हे रेडिएशन मेंदूच्या कॅन्सरला आमंत्रण देतो. बाजूला मोबाईल ठेवून झोपल्याने रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक असतात. डोकं दुखणे, चीडचीड होणे असे प्रकार वाढतात.

व्हायरल मॅसेजमागील दाव्याची पडताळणी केली असता. प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने याची माहिती सगळ्यांना मिळायला हवी. त्यामुळे झी 24 तासचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले आणि त्यांच्याकडून या दाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात…

हेही वाचा :  भीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयान अपघाताचं खरं कारण समोर

मोबाईल जवळ ठेऊन झोपू नये. रेडिएशनमुळे कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी, झोप नीट न होणे, चीडचीड होऊ शकते. त्याचबरोबर मानसिक आजारावर देखील मोठाप परिणाम होतो. रेडिएशनमुळे शरीरातील मांसपेशी दुखतात. त्याचबरोबर लैंगिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा – Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने ‘या’ गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्…

दरम्यान, झोपताना फोन जवळ ठेवू नये, त्याने कॅन्सरचा धोका वाढतो, हे स्पष्ट झालं. मात्र, सगळेच फोन वापरतात. त्यामुळे झोपताना किती दूर फोन ठेवावा हे देखील आम्ही जाणून घेतलं. त्यावेळी किमान 3 फूट फोन दूर ठेवायला हवा असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल वापरताना काळजी घ्या आणि रोगाला लांब ठेवून तुमचं आयुष्य ठणठणीत ठेवा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …