पैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

Share Market IPO Alert: यंदाच्या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येही आयपीओ मार्केटमध्ये चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. खास करुन 2023 मध्ये आलेले अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना साकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना फायदाच झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये 2 मोठे आयपीएल ओपन होणार आहेत. या आयपीओने आधीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ गातला आहे. यामध्ये डीओएमएस (DOMS) आणि आयनॉक्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच आयपीओंबद्दल जाणून घेऊयात…

डीओएमएस (DOMS)

पेन्सिल, स्टेशनरी आणि अन्य शालेय प्रोडक्ट तयार करणारी या क्षेत्रातील मोठी कंपनी डोम्स इंडस्ट्रीजचा आयपीओ आज म्हणजेच 13 सप्टेंबर 2023 रोजी सबस्क्रीप्शनसाठी ओपन होत आहे. गुंतवणूकादारांना 15 डिसेंबरपर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 1200 कोटी रुपये जमा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. कंपनीने आपल्या इश्यू केलेल्या शेअर्सची किंमत 750-790 रुपये प्रति शेअर अशी ठेवली आहे. 18 शेअर्सचा एक लॉट असून गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,220 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ग्रे मार्केटमध्ये याचं प्रमियम 480 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

हेही वाचा :  लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...

इंडिया शेल्टर फायनॅन्स कॉर्पोरेशन (India Shelter Finance Corp)

दुसरा मोठा आयपीओ आजच म्हणजे 13 डिसेंबर रोजी ओपन होत आहे. हा आयपीओ आहे इंडिया शेल्टर फायनॅन्स कॉर्पोरेशनचा. यामध्ये 13 ते 15 डिसेंबदरम्यान गुंतवणूक करता येईल. या कंपनीलाही 1200 कोटींचा निधी जमवायचा आहे. कंपनीने 469-493 रुपये प्रति शेअर बेसप्राइज निश्चित केली आहे. 30 शेअर्सचा एक लॉट आहे. एका लॉटसाठी बोली लावायची असेल तर 14,790 रुपये गुंतवावे लागतील. ग्रे-मार्केटमध्ये मंगळवारी या शेअरचं जीपीएम 40 टक्क्यांहून अधिक होऊ 200 रुपयांपर्यंत पोहोचलं.

आयनॉक्स इंडिया (Inox India)

तिसरा सर्वात मोठा आयपीओ म्हणजे आयनॉक्स इंडियाचा (Inox India). या आयपीओचं सबस्क्रीप्शन 14 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. 18 डिसेंबरला सबस्क्रीप्शन बंद होईल. ऑफर फॉर सेल इश्यूसाठी कंपनीने 627-660 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामधून कंपनीला 1459 कोटी उभारायचे आहेत. या कंपनीने शेअर्सचा एक लॉट 22 शेअर्सचा ठेवला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान 14,520 रुपये गुंतवावे लागतील. ग्रे मार्केटमध्ये याचं प्रिमियम 18 टक्के किंवा 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा :  अनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं

मेनबोर्ड आयपीओकडून नफाच

यंदाच्या वर्षी आयपीओमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना फायदाच झाला आहे. अहवालानुसार 90 टक्के मेनबोर्ड आयपीओने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार नफा मिळवू नदिला आहे. यामध्ये एसएमई आयपीओही मागे राहिलेले नाहीत. यामध्ये पैसे लावणाऱ्यांना बराच फायदा झाला आङे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये एसएमआय आयपीओ ओपन होत आहेत. यामध्ये सियाराम रिसायकलिंगचा समावेश आहे. 14 ते 18 डिसेंबरदरम्यान हा आयपीओ विकत घेत येईल. दुसरा श्री ओएसएफएम ई- मोबॅलिटीचाही आय़पीए येत असून तो सुद्धा 14 ते 18 डिसेंबरदरम्यान विकत घेता येईल.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …