नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार का? सेंगोल म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर!

New parliament house: संसदेच्या नव्या त्रिकोणाकृती इमारतीचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी नेमका स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा मुहूर्त शोधल्यानं आधीच वाद सुरू झालाय. त्यात आता या उदघाटन सोहळ्यावर एक दोन नाही तर तब्बल 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय.  (Opposition party Boycott The Inauguration Ceremony Of The New Parliament Building In Delhi)

मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे. 

कोणत्या पक्षांचा विरोध?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांचा बहिष्कार घातला आहे. तर भाजपनं मागे हटण्यास नकार दिलाय. नव्या संसद भवनाचं उदघाटन पंतप्रधान मोदीच करतील अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलंय. 

नव्या संसद भवनात चोला साम्राज्याच्या राजदंडाची स्थापना करण्यात येणार आहे. या राजदंडाची स्थापना का करण्यात येणार आहे आणि कसा असेल हा राजदंड?

हेही वाचा :  Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

कसा असेल राजदंड?

सेंगोल म्हणजे एखाद्या साम्राज्याचा राजदंड. संसदेत या सेंगोल अर्थात राजदंडाची कायमस्वरुपी स्थापना करण्यात येणार आहे. चोला साम्राज्याचा हा राजदंड असेल. हा राजदंड पूर्वी अलाहाबादच्या संग्रहालयात होता. तमिळनाडूच्या पुजाऱ्यांद्वारे या संसद भवनाची स्थापना होणार आहे.

आणखी वाचा – PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोधकांचा आक्षेप

जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतात नांदते. याच लोकशाहीचं जतन करणारी ही नव्या संसद भवनाची वास्तू. त्यामुळे अशा वास्तूच्या उदघाटन सोहळ्यावरून राजकीय वाद घालणं लोकशाहीसाठी नक्कीच शोभनीय नाही. त्यामुळे आता विरोधक कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च झालेत. सध्याच्या संसदेत 550 लोकसभा आणि 250 राज्यसभा खासदारांसाठी आसनव्यवस्था आहे. मात्र नव्या संसद भवनात 888 लोकसभा आणि 384 राज्यसभा खासदार बसू शकतील.10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूची पायाभरणी झाली. आता 28 मे 2023 रोजी मोदींच्याच हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …