पाकिस्तानातात बसून दाऊद रचतोय भारताविरुद्ध भयानक कट; NCBचा मोठा खुलासा

पाकिस्तान (Pakistan), अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या (terrorist) सातत्याने भारताविरोधी (India) कारवाया सुरुच असतात. पाकिस्तानातून नेहमीच भारताला लक्ष्य केले जाते. गेल्या काही काळापासून देशात दहशत (terrorism) पसरवण्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी काही ना काही योजना आखतच असतात. दरम्यान दहशतवादी (terrorist) आणि अंडरवर्ल्ड माफियांच्या मदतीने भारतातील तरुणांना ड्रग्जच्या माध्यमांतून पोकळ करण्याचा कट पाकिस्तान रचत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विविध यंत्रणांनी (NCB) याबाबत मोठा खुलासा केला आहे. (Pakistan dawood ibrahim planning conspiracy against India disclosure of NCB)

एनसीबीचा मोठा खुलासा

‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) ने नुकतेच भारतीय नौदलासोबत (Indian Navy) केलेल्या संयुक्त कारवाईत 60 किलो उच्च दर्जाचे एमडी ड्रग (MD) जप्त केले होते. ज्याची किंमत अंदाजे 120 कोटी रुपये होती. त्याचवेळी नवी मुंबईच्या (Navi Mumbai) न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) सफरचंद आणि संत्र्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले 50 किलोहून अधिक कोकेन यांची किंमत 500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. पकडलेल्या या सर्व ड्रग्जबाबत आरोपींची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :  झुंझुनूमध्ये आहे भारताला मालामाल बनवणारी खाण; थेट भुयारी रेल्वेतून...

दाऊद इब्राहिम मोठा कट 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीड वर्षात एनसीबीने आठ यशस्वी कारवाया केल्या आहेत. त्यानंतर या सर्व ड्रग्जमध्ये एक साम्य आढळून आले आहे. ज्यांचा थेट संबंध  दाऊद इब्राहिम, ड्रग माफिया हाजी सलीम आणि पाकिस्तानात बसलेल्या इसिसशी असल्याचे समोर आले आहे.

भारताला हादरा देण्याचा प्रयत्न 

एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी याप्रकरणी धक्कादायक माहिती दिलीय. अंमली पदार्थांची ही संपूर्ण खेप अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमधून सातत्याने येत आहे आणि भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. या मार्गाने तस्कर ड्रग्जसोबत एके 47 सारख्या धोकादायक शस्त्रांचीही तस्करी करत असल्याचा, खुलासा या अमित घावटे यांनी केला आहे. मात्र हे गुन्हेगार इतके हुशार आहेत की ते वेळोवेळी आपले मार्ग बदलत असतात, असेही घावटे म्हणाले.

मुंबई लक्ष्यावर

जर त्यांना मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करायचा असेल तर ते आधी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ड्रग्सची खेप उतरवतात. त्यानंतर ते पेडलरद्वारे पुरवठा करतात. कराचीहून येणारे ड्रग्ज इराणी बोटींच्या मदतीने भारतात येतात, असेही अमित घावटे यांनी म्हटलं आहेSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …