पुण्यातील ऑटोरिक्षा चालकाची खास ऑफर, ‘The Kerala Story’ चित्रपट पाहणाऱ्या महिलांना…

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या बराच वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केरळमधल्या (Kerala) मुलींचे बळजबरीने धर्मांतर करून नंतर त्यांना दहशतवादी बनवल्याचा दावा या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेत्री अदा शर्मासह (adah sharma) केरळमधील 32,000 महिलांचे धर्मांतर करून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, नंतर ही ओळ अन् 32 हजार मुलींचा उल्लेख  काढून टाकण्यात आला आहे. दुसरीकडे या चित्रपटाच्या टीझरचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या समर्थनात भाष्य केले आहे. 

अशातच पुण्यातील एका रिक्षाचालकाने हा चित्रपट पाहायला जाणाऱ्यांसाठी मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्याती आळंदी येथे राहणारे रिक्षाचालक साधू मगर यांची ही रिक्षा असल्याचे समोर आले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपटा पाहायला जाणाऱ्या लोकांना आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचे पोस्टर साधू मगर यांनी आपल्या रिक्षाच्या मागे लावले आहे. साधू मगर यांचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा :  Pune News: अरेररे.. ही कोणती पद्धत? रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशासोबत पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पाहा Video

साधू मगर यांच्या रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना ते मोफत सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी त्यांच्या रिक्षावर छापलं आहे. यासोबत त्यांनी एक ऑफर देखील ठेवली आहे. आळंदीतील पहिल्या 10 महिलांना या चित्रपटाचे मोफत तिकीट देणार असल्याचे मगर यांनी सांगितलं आहे. “या चित्रपटासाठी आपली रिक्षा मोफत मोफत आहे. आळंदी परिसरातील पहिल्या 10 महिलांसाठी मोफत तिकीट,” असे मगर यांच्या रिक्षाच्या मागे असणाऱ्या पोस्टरवर लिहीले आहे.

ऑप इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार साधू मगर हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरातील रहिवासी आहेत. ते पूर्वी पुण्यातील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. पण तीन वर्षांपूर्वी, त्यांनी ऑटोरिक्षा विकत घेतली आणि स्वतःचा वाहतूक व्यवसाय सुरू केला. पुण्यातील आळंदी आणि मरकळ भागात ते आपली ऑटोरिक्षा चालवतात.

“मी द केरळ स्टोरीचा टीझर पाहिला. मला तो खूप आवडले. मी ही ऑफर सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण अनेक हिंदू महिला या लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. मला हिंदू स्त्रियांनी या सापळ्याबद्दल सावध करायचे आहे. मला त्यांना या समस्येची जाणीव करून द्यायची होती. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी मला जाहिरात करायची होती आणि म्हणूनच मी ही ऑफर दिली आहे,” असे साधू मगर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :  ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …