Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् ‘हा’ अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!

Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. तिच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाला बंपर यश मिळाले आहे. रश्मिका मंदना ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जाते. आता अशी चर्चा आहे की, रश्मिका लवकरच लग्न करणार आहे. रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांची जोडी सर्वांनाच आवडते. नुकतेच दोघेही मुंबईत एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या वर्षी दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, रश्मिका किंवा विजय या दोघांनीही याबाबत खुलासा केलेला नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासून दोघे अनेकदा एकत्र दिसले. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे. विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या ‘लायगर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कपल डेटची चर्चा!

रश्मिका मंदनाने नुकतेच मुंबईत अपार्टमेंट खरेदी केले आहे. दुसरीकडे, रश्मिका आणि विजय देवरकोंडा अनेकवेळा मुंबईत एकत्र डेटवर जाताना दिसले आहेत. रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा त्यांच्या गोवा ट्रिपपासून झाली होती. या अभिनेत्रीने विजय आणि त्याचा भाऊ आनंदसोबत गोव्यात नवीन वर्ष साजरे केले होते. विजयच्या आईसोबत रश्मिकाचे चांगले संबंध आहेत.

पहिला साखरपुडा मोडला!

2017मध्ये रश्मिका मंदानाने रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. लग्नाआधी या दोघांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. हे नाते तुटल्यानंतर रश्मिकाला खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर रश्मिकाने स्पष्ट केले की, ‘मी खूप दिवसांपासून माझ्याबद्दल अनेक गॉसिप ऐकत आहे, या गोष्टी मला रोज त्रस्त करतात. मी इथे कोणाला समजावायला आलेले नाही. तुम्हाला माझी स्थिती समजून घ्यावी लागेल, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.’  

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Happy Birthday Konkona Sen Sharma : राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी कोंकणा सेन शर्मा!

Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा …

Akshaya Hardeek Wedding : नांदा सौख्यभरे! ‘अहा’चं दणक्यात पार पडलं लग्न

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी …