विक्रम वेधा हा सिनेमा तमिळ सिनेमाचं हिंदी वर्जन आहे. सिनेमाच्या हिंदी वर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलरवरुन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप लेव्हल एक्शन, जबरदस्त अँक्शन, थ्रिलिंगचा पुरेपुर पॅकेज ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेता सैफ आणि ऋतिक पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोघांच्या पावरपॅक अभिनयानं भरलेला सिनेमा पाहण्यासाठी दोघांच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
हेही वाचा – The Kapil Sharma Show मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट, समोर आलं कारण
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे की, हृतिक रोशन ग्रे शेड रोलमध्ये आहे. हृतिकच्या धमाकेदार एक्शनसाठी थिएटरमध्ये शिट्टा वाजतील असं दिसत आहे. इतकंच नाही सिनेमातील दोघांचे लुक्सही काहीसे वेगळे दिसत आहेत ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
विक्रम वेधाची कहाणी अनेक ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेली असणार आहे. सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत आहे तर हृतिक रोशन गँगस्टर वेधाच्या भूमिकेत आहे. दोघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळतेय. दोघांमध्ये जबरदस्त फाइट सीन्स पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर विक्रम वेधाच्या ट्रेलरवर चाहत्यांनी फायर इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या