स्मृतीचं शतक हुकलं, टीम इंडियानं इंग्लंडला पहिल्या वन डेत धू धू धुतलं

होव-इंग्लंड, 18 सप्टेंबर: सलामीवीर स्मृती मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघानं इंग्लंडचा पहिल्या वन डेत 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडनं या सामन्यात भारतासमोर 228 धावांचं आव्हान ठेवलं होतं. स्मृती मानधना, यास्तिका भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीतच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारतानं हे आव्हान 34 चेंडू आणि 7 विकेट्स राखून पार केलं.

स्मृतीचं शतक हुकलं

228 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीची शफाली वर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाली. पण त्यानंतर स्मृतीनं यास्तिका भाटियाच्या साथीनं भारताच्या विजयाचा पाया रचला. त्या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. यास्तिका 50 धावा काढून माघारी परतली. मग स्मृतीनं कर्णधार हरमनसह तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची आणखी एक मोठी भागीदारी साकारली. मात्र 91 धावांवर असताना सोपा कॅच देऊन ती बाद झाली. स्मृतीचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. त्यानंतर हरमननं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. तिनं नाबाद 74 धावांची खेळी केली.

हेही वाचा – IndW vs EngW:  जोडी तुझी माझी… गेल्या 20 वर्षात भारतीय महिला क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडलं

भारताचा प्रभावी मारा

त्याआधी भारताच्या सर्वच गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित मारा केला. त्यामुळे इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 7 बाद 227 धावाच करता आल्या. अखेरची मालिका खेळणाऱ्या झुलन गोस्वामीनं 10 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देताना एक विकेट घेतली. तर दिप्ती शर्मानं 33 धावात दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मेघना सिंग, हर्लिन देओल, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाडनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

सर्व काही झुलनसाठी  

99 चेंडूत नाबाद 91 धावा करणाऱ्या स्मृती मानधानाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्मृतीनं ‘ही मालिका आम्ही झुलनसाठी खेळतोय. आम्ही या मालिकेत जे काही करतोय ते केवळ झुलनसाठी’ अशी भावना व्यक्त केली. भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज झुलनची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतली ही अखेरची मालिका आहे. या मालिकेतल्या अखेरच्या लॉर्डस वन डेनंतर झुलन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच …

रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक… तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक

मोहाली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० सामन्यात सलग तीन पराभव आता पत्करावे लागले. पण या तिन्ही …