स्वरा जिने सशक्त अभिनयाने इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय स्थान निर्माण केले आहे. स्वरा आणि वाद हे समीकरण आपल्याला वारंवार पहायला मिळतं. विषय कोणताही असो स्वरा स्वत: चे मत मांडायला मागे पुढे कधीच बघत नाही. स्वराचे बालपण दिल्लीत गेले आणि त्यानंतर तिने दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून इंग्रजी साहित्यात पदवी आणि त्यानंतर जेएनयूमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
हेही वाचा – नशेत ऑऊट ऑफ कंट्रोल झाली Sara Ali Khan; सेक्युरिटी गार्डसोबतच…; VIDEO VIRAL
मुंबईत येण्यापूर्वी स्वरा भास्करने दिल्लीतील एका थिएटरमध्ये काम केलं. जिथून ती सुरुवातीला अभिनय कौशल्ये शिकली. स्वरा 2008 मध्ये मुंबईत आली. तिने 2009 मध्ये माधोलाल कीप वॉकिंग या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. स्वरा भास्करने ‘तनु वेड्स मनू’, ‘औरंगजेब’, ‘रांझना’, ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘अनारकली ऑफ आरा’, ‘जहाँ चार यार’ ते ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.
दरम्यान, मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे. ‘जहां चार यार’ या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या