‘जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय’; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना

Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (वय 70) यांचे काल रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लाहिरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, बप्पी लाहिरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते.  पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत.   त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यां प्रति संवेदना. ओम शांती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 

बालपणीपासून बप्पीदांना संगीताची आवड

त्यांचे वडील अपरेश लाहिरी तर आई बान्सरी लाहिरी. बप्पी लाहिरींना संगीताचं सुरुवातीची शिक्षण आपल्या घरातच मिळालं.   वयाच्या 17 वर्षापासूनच बप्पी लाहिरी हे संगीतकार होण्याचं ठरवलं होतं. तीन वर्षाचे असल्यापासून ते तबला वादन शिकले  त्यांची प्रेरणा होते एसडी बर्मन. एसडी बर्मन यांची गाणी ऐकूण ते रियाज करायचे. 

त्यांनी बॉलिवूडला रॉक आणि डिस्कोशी नवी ओळख करुन दिली. संपूर्ण देशाला आपल्या गीतांवर थिरकायला भाग पाडलं.  चलते चलते, डिस्को डांसर, शराबी अशा एकाहून एक सरस चित्रपटांना संगीताचा साज चढवत त्यांनी 80चं दशक चांगलंच गाजवलं. बागी 3 चित्रपटातलं भंकस हे गाणं त्यांचं शेवटचं गाणं ठरलं. 

इतर संबंधित बातम्या

PHOTO : ‘सोन्या’सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके ‘बप्पीदा’; जीवनप्रवास कसा होता?

Bappi Lahiri : संगीतातील ‘गोल्डमॅन’ बप्पीदांचे राजकारणाशी मात्र सूर जुळलेच नाहीत!

Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Bappi Lahiri : ‘डिस्को’ सिंगर हरपला! शेकडो गाण्यांना दिला संगीताचा साज; अनेक गाणी गायली, बप्पीदांची सदाबहार गाणीSource link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रश्मिकासोबत काम करणार का? ऋषभ शेट्टीच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं केलं असून त्याने …

वरुणच्या ‘भेडिया’ नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला

Bhediya Box Office Collection Day 2: दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट शुक्रवारी …