आलिया भट्ट आणि रणबीरकपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला होता. ओपनिंग विकेंडला चित्रपट सगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकेंडला सिनेमानं एकूण 122.58 करोडची कमाई केली होती. चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 37 कोटींची कमाई केली होती. इतक्या ट्रोलिंगनंतर सिनेमानं ही केलेली ही बंपर कमाई पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचवाल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 42 कोटींचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी ही कमाई वाढत तब्बल 44.80 कोटींवर पोहोचली होती. तर अवघ्या काही दिवसांत चित्रपटाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान आता चित्रपटाच्या कमाईत घट होत असल्याचा म्हटलं जात आहे. नुकतंच चित्रपटाच्या बाराव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. परंतु हे कलेक्शन इतर दिवसांच्या तुलनेत कमी असल्याचं दिसून येत आहे. रिलीजच्या 12 व्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ ने केवळ 3.5 ते 4.20 कोटींचीच कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून आजपर्यंतची ही सर्वात कमी कमाई आहे.त्यामुळे आता ‘ब्रह्मास्त्र’चा जादू संपला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच आता ब्रह्मास्त्रची एकूण कमाई 224.10 कोटी इतकी झाली आहे.
(हे वाचा:Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा बोलबाला; पाचव्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई )
‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटासाठी तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन, मौनी रॉय अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट शिवा अर्थातच रणबीर कपूरभोवती फिरणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या