आलिया-रणबीरच्या या चित्रपटाने वीकेंडमध्येच 125 कोटींची कमाई केली होती. परंतु सोमवार आणि मंगळवारी कमाईत थोडी घट झालेली दिसून आली. मात्र, रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबरलाही चित्रपटाने 13.75 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर पुन्हा वेग पकडला आहे. सध्या हिंदी व्हर्जन 150 कोटी क्लबमध्ये सहभागी झाला आहे.
वीकेंडनंतरही ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. येत्या वीकेंडमध्ये कमाईचा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच हा चित्रपट अनेक नवे रेकॉर्डही आपल्या नावावर करु शकतो. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ चा परिणाम ‘ब्रह्मास्त्र’वर झालेला दिसून येत नाहीय. त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36.42 कोटी कमावले होते. चित्रपटाने शनिवारी 42.41 कोटींची कमाई केली होती. तर रविवारी हा आकडा 45.66 कोटींवर पोहोचला होता.
(हे वाचा:Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई )
‘ब्रह्मास्त्र’साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय यांचासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.तसेच शाहरुख खानचासुद्धा दमदार कॅमिओ आहे.हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषेत रिलीज झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या